---Advertisement---

मॅक्सवेलची यंदाचा ‘सिक्सर किंग’ बनण्याच्या दिशेने कूच, हैदराबादविरुद्ध २ षटकार ठोकत दुसऱ्या स्थानी उडी

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 11:42 AM
---Advertisement---

बुधवारी (६ ऑक्टोबर) शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२१ चा ५२ वा सामना पार पडला. या सामन्यात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला सनरायझर्स हैदराबाद आणि प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान पक्के केलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ एकमेकांशी भिडले. सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव झाला असला तरीही त्यांचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त खेळी केली आणि त्याच्या नावावर एक नवा विक्रमही नोंदवला आहे.

मॅक्सवेलने सामन्यात आरसीबीसाठी १६० च्या स्ट्राइक रेटने २५ चेंडूत ४० धावा केल्या. या धावांमध्ये मॅक्सवेलच्या तीन चौकार आणि दोन षटकारांचाही समावेश आहे. सामन्यात मॅक्सवेलेने दोन षटकार मारले असून त्याच्या मदतीने तो हंगामातील दुसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. मॅक्सवेलने या आयपीएल २०२१ च्या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २१ षटकार मारले आहेत.

हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने या संपूर्ण हंगामात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २२ षटकार ठोकले आणि यादीत पहिले स्थान मिळवले आहे. त्याच्यानंतर मॅक्सवेल हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मारलेल्या दोन षटकारांच्या मदतीने आता या यादीत २१ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्जचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने हंगामनात आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये २० षटकार ठोकले आहेत. ऋतुराज या हंगामात तिसरा सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावले आणि १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबी संघने २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावल्या आणि १३७ धावा करता आल्या. परिणामी आरसीबीला सामन्यात पराभव मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या-

चूकीला माफी नाही! कोहलीच्या लाडक्या सिराजने सोडला सोपा झेल, कर्णधाराने मैदानातच ऐकवलं

‘मी धावबाद करतो’, म्हणत विराटची स्टंप्सकडे धाव; मग झालं असं काही की मॅक्सवेल-चहलने उडवली खिल्ली

विलियम्सनचा हवेतून अचूक डायरेक्ट हिट आणि उडून पडल्या दांड्या, बघा मॅक्सवेलची ‘गेम चेंजर’ विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---