ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) हा 2024च्या आयपीएल हंगामात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा भाग होता. गेल्या हंगामात मॅक्सवेलचा फाॅर्म खूप खराब राहिला. त्यामुळे आरसीबी त्याला संघात कायम ठेवणार की नाही? यावरदेखील चाहत्यांच्या चर्चा सुरु आहेत. तत्पूर्वी आरसीबी चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर सुरू असलेल्या पोस्टनुसार, मॅक्सवेलनं इंस्टाग्रामवर आरसीबीला अनफॉलो केलं आहे.
आरसीबीनं मॅक्सवेलला 2021च्या लिलावामध्ये करारबद्ध केलं होतं. तर 2022 च्या लिलावापूर्वी ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) आरसीबीनं कायम ठेवलं होतं. त्याला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आलं होतं. 2021मध्ये बेंगळुरु संघाचा भाग बनलेल्या मॅक्सवेलनं आरसीबीसाठी 15 सामन्यात 513 धावा ठोकल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 144.10 राहिला होता. तर 2023 मध्येही त्यानं आरसीबीसाठी 14 सामन्यांमध्ये 400 धावा ठोकल्या होत्या.
परंतू आयपीएल 2024च्या हंगामात मॅक्सवेल आरसीबीसाठी चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यानं शेवटच्या हंगामात आरसीबीसाठी 10 सामने खेळले. त्यामध्ये त्यानं केवळ 52 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 5.78 राहिली तर स्ट्रईक रेट 120.93 राहिला. शेवटच्या हंगामात त्यानं 2 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. त्याची सर्वोच्च धावसंख्या 28 राहिली होती.
ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) त्याच्या आयपीएल कारकीर्दीत एकूण 134 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 156.73च्या स्ट्राईक रेटसह 2,271 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 24.74 राहिली आहे. तर 134 सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 95 राहिली आहे. संपूर्ण आयपीएल कारकीर्दीत त्यानं 232 चौकारांसह 160 षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मनू भाकरनं जे केलं, ते कोणताच भारतीय करू शकला नाही! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडला इतिहास
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी शूटींगला सुरुवात; कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग?
इतिहास घडला!! मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीचा कांस्यपदकावर निशाणा