वनडे विश्वचषक 2023 मध्ये बुधवारी (25 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड संघ भिडताना दिसत आहेत. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर याने शतक झळकावल्यानंतर अखेरच्या दहा षटकात ग्लेन मॅक्सवेल याचे वादळ आले. त्याने केवळ 40 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा मान मिळवला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या 40 षटकांमध्ये मोठी मजल मारण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. मात्र, मॅक्सवेल मैदानात आल्यावर संपूर्ण डावाला जोरदार गती मिळाली. त्याने 27 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने धावांची अचानक गती वाढवत पुढील 50 धावा केवळ 13 चेंडूंमध्ये तडकावल्या. 40 चेंडूंमध्ये शतक करताना त्याने नऊ चौकार आणि तब्बल आठ षटकारांची बरसात केली. हे 48 वर्षांच्या विश्वचषक इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरले.
यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ऐडन मार्करम याच्या नावावर होता. त्याने याच विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूंमध्ये ही कामगिरी करून दाखवली होती. यापूर्वी 2011 यांनी इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूवर शतक झळकावले होते.
(Glenn Maxwell Hits Fastest ODI Hundred In ODI World Cup History In 40 Balls)