न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या टी20 सामन्यात विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने शानदार शतक झळकावले होते. या शतकावर अनेद दिग्गजांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेकांनी त्याची प्रशंसा केली होती. आता यामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडूचाही समावेश झाला आहे. ग्लेन मॅक्सवेलने सूर्यकुमार यादवच्या शतकावर वक्तव्य केले, जे भलतेच चर्चेत आहे. चला तर जाणून घेऊया काय म्हणाला मॅक्सवेल.
सूर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी
न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघातील दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने यावेळी 51 चेंडूत नाबाद 111 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 7 षटकार आणि 11 चौकारांचाही पाऊस पाडला होता.
Another day, another Suryakumar Yadav special ????
Watch the #NZvIND series live on https://t.co/MHHfZPzf4H (in select regions) ???? pic.twitter.com/ijBaXZ9RRU
— ICC (@ICC) November 20, 2022
काय म्हणाला मॅक्सवेल?
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याच्यानुसार, तो हे पाहून हैराण झाला होता की, सूर्यकुमारने कशाप्रकारे फलंदाजी केली होती आणि इतर फलंदाज कसे खेळत होते. माध्यमांशी संवाद साधताना मॅक्सवेलने सूर्यकुमारबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने सांगितलं की, सूर्यकुमारच्या शतकी खेळीविषयी तो काय म्हणाला होता.
‘सूर्यकुमार यादव इतर फलंदाजांपेक्षा जास्त चांगला खेळत होता’
मॅक्सवेल म्हणाला की, “मला माहिती नव्हते की, सामना होत आहे, पण नंतर मी स्कोरकार्ड पाहिला. त्यानंतर त्याचा फोटो ऍरॉन फिंचला पाठवला. तसेच, मी म्हणालो की, हा खेळाडू नेमका काय करत आहे? हा बिल्कुल वेगळ्याच ग्रहावर फलंदाजी करत आहे. बाकीच्या फलंदाजांच्या धावा पाहा आणि याच्या धावा पाहा. त्याने 50 चेंडूत 111 धावा बनवल्या. मी दुसऱ्या दिवशी त्या खेळीचा रिप्ले पाहिला आणि मला खूपच विचित्र वाटले की, इतर फलंदाजांपेक्षा तो जास्त चांगला खेळत होता. हे पाहणे खूपच कठीण होते. कारण, सूर्यकुमार यादव सर्वात पुढे आहे.”
खरं तर, सूर्यकुमारला त्याच्या अनोख्या फटक्यांमुळे ‘मिस्टर 360’ म्हटले जात आहे. एबी डिविलियर्स या नावासाठी प्रसिद्ध होता. आता त्याच्या पाठोपाठ सूर्यकुमारलाही या नावाने बोलावले जात आहे. (glenn maxwell reacts on suryakumar yadav s hundred ind vs nz match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- बांगलादेशमधील तिसऱ्या वनडेच्या दिवशीच आंदोलन, यजमानांच्या बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
विराट कोहलीवर आली भांडी घासण्याची वेळ, फोटो होतोय भलताच व्हायरल






