fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मॅक्सवेलने धुतले इंग्लंडला, टेन्शन आले आयपीएलमधील इतर संघांना

September 17, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांची मालिका गुरुवारी ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखत जिंकली. या विजयात ग्लेन मॅक्सवेलच्या ९० चेंडूत १०८ धावा व ऍलेक्स कॅरेच्या ११४ चेंडूत १०६ धावा या सामन्यातील विशेष ठरल्या. यात ऍलेक्स कॅरे सहाव्या तर ग्लेन मॅक्सेवल सातव्या स्थानावर फलंदाजीला आला होता.

या सामन्यात ३१ वर्षीय ग्लेन मॅक्सवेलने एक खास पराक्रम केला. त्याने वनडे कारकिर्दीत ३ हजार धावांचा टप्पा पार केला. ११३ वनडे सामन्यांत १०३ डावांत फलंदाजी करताना त्याने ३३.२९च्या सरासरीने ३०६३ धावा केल्या.

९० चेंडूत १०६ धावा करताना मॅक्सवेलने ४ चौकार व ७ षटकार मारले. शिवाय ७व्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघ संकटात असताना त्याने हा कारनामा केला. यामुळे त्याच्या खेळीचे जगभरातून कौतूक होत आहे.

हाच मॅक्सवेल आयपीएल २०२०साठी सज्ज झाला आहे. तो किंग्ज ११ पंजाब संघाकडून खेळणार आहे. या संघाचे त्याने एकेवेळी कर्णधारपदही भुषविले आहे. तसेच यावेळी तो भारतीय प्रतिभावान क्रिकेटर केएल राहुच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे खेळाडू शुक्रवारी इंग्लंडवरुन दुबईला रवाना होणार आहे. येथे त्यांना २३ तारखेपर्यंत क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यानंतर मात्र मॅक्सवेल आयपीएलमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज असेल.

मॅक्सवेलने  आयपीएलमध्ये ६९ सामन्यात २२.९च्या सरासरीने १३९७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट हा १६१.१३चा जबरदस्त आहे. अतिशय स्फोटक फलंदाज म्हणून त्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे  संघासाठी तो उपयुक्त गोलंदाजीही करतो. गेले काही महिने हा खेळाडू क्रिकेटपासून दूर होता. परंतू आता त्याने कमबॅक जबरदस्त केले आहे. यामुळे यावेळी इतर संघांना त्याचे एक वेगळेच टेन्शन असणार आहे.


Previous Post

आफ्रिदी, सेहवाग, एबीचे विक्रम मॅक्सवेलने एका झटक्यात मोडले

Next Post

पंतचा रिव्हर्स स्कूप शॉट पाहून सर्वजण झाले अवाक, व्हिडिओ होतोय व्हायरल

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/mipaltan
क्रिकेट

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Photo Curtsey : Twitter/ICC
क्रिकेट

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals
क्रिकेट

“त्याला नक्कीच मोठे सिक्रेट्स माहित असणार”, राजस्थानने उनाटकटला संघात कायम केल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

January 21, 2021
Photo Curtsey : Twitter/ICC/Mohammad Siraj Instagram
क्रिकेट

विमानतळावरुन सिराजने धरली थेट स्मशानभूमीची वाट अन् वडिलांना वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून पाणावतील डोळे

January 21, 2021
Next Post
Screengrab: Twitter/DelhiCapitals

पंतचा रिव्हर्स स्कूप शॉट पाहून सर्वजण झाले अवाक, व्हिडिओ होतोय व्हायरल

Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

हा खेळाडू म्हणतो, बायो बबलमध्ये राहणे म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखंच

Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांचा लागला तपास;  तिघा जणांना झाली अटक

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.