---Advertisement---

DC vs MI: मुंबईच्या विजयाला दिशा देणारा ‘हा’ टर्निंग पाँईंट ठरला निर्णायक

On: सोमवार, एप्रिल 14, 2025 7:36 AM
---Advertisement---

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण दिल्ली संघ फक्त 193 धावा करू शकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे, याआधी त्यांनी सलग 4 विजय मिळवले होते. दुसरीकडे, जर मुंबईने हा सामना गमावला असता, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला असता. 19व्या षटकात, मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षकांनी विचित्र पद्धतीने धावबाद होण्याची हॅटट्रिक साकारत सामना जिंकला.

206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दीपक चहरने मुंबईची चांगली सुरुवात करून दिली. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कला बाद केले. त्यानंतर अभिषेक पोरेल आणि करुण नायर यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा कणा मोडला. दोघांनी मिळून 61 चेंडूत 119 धावा जोडल्या. पोरेल 33 धावा करून बाद झाला, पण करुण नायर वेगळ्याच मूडमध्ये फलंदाजीला आला. 89 धावांची तुफानी खेळी खेळून नायर बाद झाला तेव्हा दिल्लीला विजयासाठी 50 चेंडूत 71 धावा करायच्या होत्या, जे खूप सोपे लक्ष्य वाटत होते.

12 षटकांत दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी गमावून 140 धावा केल्या होत्या. संघाला विजयासाठी 48 चेंडूत 66 धावा करायच्या होत्या. येथून, करुण नायरसह , ट्रिस्टन स्टब्स आणि केएल राहुलसह इतर फलंदाजांनी नियमित अंतराने आपले विकेट गमावले. ज्यामध्ये केएल राहुलची विकेट मोलाची होती. कारण तो शानदार फाॅर्ममध्ये होता. तो जर शेवटपर्यंत थांबला असता तर सामन्याचा निकाल अधीच दिल्लीच्या बाजूने लागला असता. पण सामन्याच्या निर्णयाक टप्प्यावर मुंबई इंडियन्सने कमबॅक केला. ज्यामुळे मुंबई संघाने अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---