बुधवारी (३० सप्टेंबर) भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने विक्रमी शतकी खेळी केली. त्याने अवघ्या ६५ चेंडूंतच हे शतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तो क्रीजवर अधिक काळ टीकू शकला नाही आणि १०१ धावा करत बाद झाला.
गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय कर्णधार शुभमन गिलचा हा निर्णय चुकल्याचे दिसले. कारण वेस्ट इंडिजने धमाकेदार सुरूवात केली. सलामीवीर जॉन कॅम्पबेल भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतक करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ठरला.
कॅम्पबेलने हा विक्रम करताना १९९९ मध्ये रिकार्डो पॉवेलने केलेला विक्रम मागे टाकला. पॉवेलने सिंगापूर येथे भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये ७२ चेंडूंत शतक केले होते.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी केलेले सर्वात जलद एकदिवसीय शतक (चेंडूंच्या संख्येनुसार)
६५ – जॉन कॅम्पबेल, गुवाहाटी २०२६
७२ – रिकार्डो पॉवेल, सिंगापूर १९९९
७३ – मार्लन सॅम्युअल्स, विजयवाडा २००२
७४ – शिमरॉन हेटमायर, गुवाहाटी २०१८
८५ – शिमरॉन हेटमायर, चेन्नई २०१९
कॅम्पबेलचे हे दुसरे एकदिवसीय शतक आहे. तसेच वेस्ट इंडिज क्रिकेटचा एकदिवसीय सामन्यांचा इतिहास पाहिला तर सर्वात वेगवान शतक ब्रायन लाराच्या नावावर आहे. त्याने १९९९ मध्ये ढाकामध्ये बांगलादेशविरुद्ध ४५ चेंडूतच शतक पूर्ण केले होते. या यादीत कॅम्पबेल पाचव्या स्थानावर आहे.
वेस्ट इंडीजसाठी सर्वात जलद वनडे शतक (चेंडूंच्या संख्येनुसार)
४५ – ब्रायन लारा वि. बांगलादेश (ढाका, १९९९)
५५ – ख्रिस गेल वि. इंग्लंड (सेंट जॉर्ज्स, २०१९)
६१ – एविन लुईस वि. श्रीलंका (पल्लेकेले, २०२४)
६३ – निकोलस पूरन वि. नेदरलँड्स (हरारे, २०२३)
६५ – जॉन कॅम्पबेल वि. भारत (गुवाहाटी, २०२६)
६६ – शाई होप वि. न्यूझीलंड (नेपियर, २०२५)
(IND vs WI, 2nd ODI: John Campbell Smashes fastest century against India)






