रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याला फार तेज मानले जाते. तो केवळ क्षेत्ररक्षणातच चपळता दाखवत नाही, तर फलंदाजीदरम्यानही वेगाने धावून धावा चोरून घेतो. परंतु चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या आयपीएल २०२२मधील ४९व्या सामन्यात तो कदाचित हे विसरला होता की, यष्टीमागे एमएस धोनी आहे. याचा परिणाम विराटचा सहकारी ग्लेन मॅक्सवेलला भोगावा लागला. धोनी आणि रॉबिन उथप्पाने मिळून मॅक्सवेलला केवळ ३ धावांवर धावबाद केले.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरचा संघ २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १७३ धावा करू शकला. सलामीला फलंदाजीला आलेला फाफ डू प्लेसिस ३८ धावांवर बाद झाल्यानंतर मॅक्सवेल (Glenn Maxwell) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. विराट (Virat Kohli) आणि मॅक्सवेल मिळून संघाचा डाव पुढे नेत होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान नवव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विराटने कव्हरकडे हलक्या हाताने फटका मारत धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या इशाऱ्यावर मॅक्सवेलही धाव घेण्यासाठी पळाला. परंतु तोपर्यंत उथप्पाने चेंडू पकडत तो यष्टीरक्षक धोनीकडे थ्रो केला. धोनीने नेहमीप्रमाणे चपळता दाखवत त्वरित चेंडू पकडला आणि यष्ट्या उडवल्या. हे सर्व इतक्या वेगाने घडले की, मॅक्सवेल तोपर्यंत क्रिजपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी तो धावबाद (Glenn Maxwell Ruoout) झाला.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मॅक्सवेल बाद होऊन पव्हेलियनला परतत असताना विराटच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आपण धाव घेण्यासाठी घाई केल्याचा पश्चाताप दिसत होता. यामागचे अजून एक कारण म्हणजे, विराट धावबादमध्ये सहभागी होण्याची ही या हंगामातील चौथी वेळ आहे. तो २ वेळा स्वत धावबाद झाला आहे. तर त्याने २ वेळा आपल्या साथी फलंदाजाला बाद केले आहे.
बेंगलोरच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, महिपाल लोमरोरने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याने २७ चेंडू खेळताना २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने या धावा फटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त फाफ डू प्लेसिसने ३८ व विराटने ३० धावांचे योगदान दिले. तसेच दिनेश कार्तिकने शेवटच्या षटकात नाबाद २६ धावांचे योगदान दिले आणि बेंगलोरने धावफलकावर १७३ धावा लावल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच षटकात घडला ड्रामा, चौधरीने विराटला फेकून मारला चेंडू; मग काय झालं पाहाच
तिलक वर्माने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य, कर्णधार रोहितच्या ‘या’ सल्ल्यामुळे मिळाली मदत
आरसीबीविरुद्धचा सामना धोनीसाठी खूपच खास, बनलाय चेन्नई सुपर किंग्सचा एकमेव ‘द्विशतकवीर’