रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल हा जितका प्रतिभाशाली गोलंदाज आहे, तितकाच तो मस्तीखोर स्वभावाचा व्यक्तीही आहे. मैदानावर किंवा मैदानाबाहेर सतत हसतमुख राहणारा आणि इतरांनाही हसवणारा चहल आपल्या गमतीशीर हरकतीतींनी बऱ्याचदा सोशल मीडियाचे लक्ष वेधत असतो. बुधवार रोजी (२९ सप्टेंबर) दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ४३ वा सामना झाला. या सामन्यादरम्यानही तो मस्ती करताना दिसला आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकांत ९ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा फलकावर नोंदवल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि कर्णधार विराट कोहली मैदानावर वेगाने धावा करत होते. यावेळी डगआऊटमध्ये चहलची मस्ती चालू होती.
कोहली आणि पडीक्कलची फलंदाजी सुरू असताना कॅमेरामनने डगआऊटमध्ये बसलेल्या बेंगलोर संघाच्या खेळाडूंकडे कॅमेरा फिरवला. कॅमेरा त्यांच्याकडे वळला तेव्हा ग्लेन मॅक्सवेल पायांना पॅड बांधत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जाण्यासाठी तयार होत होता. अगदी समालोचकही त्यावेळी बेंगलोरकडून तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजीला येईल?, यावर चर्चा करत होते. इतक्यात बाजूला बसलेल्या चहलने कॅमेरामनकडे पाहिले आणि त्याच्याकडे आपल्या हाताची ३ बोटे दाखवत मॅक्सवेलला डिवचण्याचा प्रयत्न केला.
https://twitter.com/Enoughraa/status/1443249528681877505?s=20
Commentator – Who should bat at number 3 for RCB among Bharat, Maxwell and ABD ?
Chahal reaction – Myself#RCBvRR || #IPL2021 pic.twitter.com/XemtnNFSr0
— Abhi (@Abhicricket18) September 29, 2021
मुळात चहल कॅमेराकडे पाहून मॅक्सवेल नाही तर आपण स्वत: तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला जात आहोत, अशी गंमत करत होता. फक्त तसा इशारा करुन चहल थांबला नाही तर त्याने आपल्याजवळ असलेली बॅट दाखवत खरोखरच आपण फलंदाजी करणार असणार असल्याची खात्री दर्शकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. हे पाहून मागे बसलेला मॅक्सवेल आणि इतर खेळाडू खदखदून हसत होते. चहलचे हे मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/pant_fc/status/1443261055648485387?s=20
चहलने या सामन्यात त्याच्या मौज-मजेशिवाय दमदार गोलंदाजी प्रदर्शनानेही सर्वांची वाहवा लुटली. ४ षटके गोलंदाजी करताना त्याने केवळ १८ धावा देत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्याच्या योगदानामुळे बेंगलोरने राजस्थानविरुद्ध ७ विकेट्सने सोपा विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
युझवेंद्रने राजस्थानच्या फलंदाजांचा उडवला धुव्वा, पत्नी धनश्रीचा आनंद अनावर; फोटोंनी वेधले लक्ष
अखेर ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, कसोटी अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे
त्यावेळी मॉर्गनने विश्वचषक उचलण्यास नकार द्यायला हवा होता, सेहवागचा इंग्लिश कर्णधाराला टोला