ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन स्टार एका पबमध्ये पार्टी करत होता. पण अचानक त्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करावी लागले. अष्टपैलू खेळाडू त्यावेळी दारुच्या नशेत असल्याचेही बोलले जात आहे. पण अद्याप याविषयी कुठली ठोस माहिती दिली गेली नाहीये.
ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याला मागच्या आठवड्यात 19 जानेवारी रोजी एका पबमधून रुग्णालायात दाखल करावे लागेल. माहितीनुसार मॅक्सवेलला रुग्णालयात नेण्यासाठी ऍम्बुलन्स बोलवली गेली होती. पण रुग्णालयात भरती झाल्यानंतर काहीच वेळात तो तिथून बाहेर देखील पडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा याविषयीचा तपास अजून सुरू आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या माहितीनुसार 19 जानेवारी रोजी मॅक्सवेल एका गोल्फ इवेंटला हजर राहिला होता. त्यानंतर तो माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज ब्रेट ली याचे बँड ‘सिंक्स ऍन्ड आऊट’चा कार्यक्रम पाहण्यासाठी एका पबमध्ये गेला. याच पबमधून त्याला रॉयल एडिलेट रुग्णालयात न्यावे लागले. या रुग्णालयात मॅख्सवेलने थांबण्यात नकार दिल्यामुळे हा मुद्दा वादाचे कारण ठरत आहे.
ईएसपीएन क्रिकइंपोच्या माहितीनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून असे सांगितले गेले आहे की, “बोर्डाला मागच्या आठवड्यापर्यंत मॅक्सवेलसोबत झालेल्या घटनांची माहिती आहे. त्यापुढचा तपास अजून सुरू आहे.” ऑस्ट्रेलियन संघ सध्या मायदेसात वेस्ट इंडीजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मॅक्सवेल या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचा भाग नाहीये. त्यानंतर उभय संघात 2 फेब्रुवारी पासून या दोन संघात तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळली जाईल. वनडे मालिकेसाठीही मॅक्सवेलला संघात निवडले गेले नाहीये.
Glenn Maxwell was reportedly taken to hospital in an ambulance following an incident in Adelaide !!! pic.twitter.com/0NArKLk5AV
— FAWAD KHATTAK✨ (@babarAzam231) January 23, 2024
अशात काहीजन मॅक्सवेलबाबतच्या या बातम्या आणि वनडे संघात त्याची न झालेली निवड, या दोन गोष्टींना एकत्र जोडत आहेत. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार तसे काही नाहीये. बोर्ड वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मॅक्सवेलचा विचार करतो आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने असे सांगितले आहे की, “वनडे संघात त्याला संधी न देण्याची या घटनेचा काही संबध नाहीये. हा निर्णय बीबीएस आणि त्याच्या वैयक्तिक योजनांमुळे घेतला गेला होता. तो टी-20 मालिकेतून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.”
वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडलेला ऑस्ट्रेलिया संघ –
स्टीव स्मिथ (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्लेट, नाथन एलिस, कॅमरन ग्रीन, एरोन हार्डी, ट्रेविस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, जेक फ्रेसर, लांस मोरिस, मॅट शॉर्ट, एडम जम्पा.
(Glenn Maxwell, who was partying in a pub, had to be hospitalized)
महत्वाच्या बातम्या –
ICC Men’s T20I Team of the Year घोषित, सूर्यकुमार यादव बनला कर्णधार, ‘या’ तीन भारतीयांनाही संधी
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारताला मोठा धक्का, अनुभवी खेळाडू खास कारणास्तव बाहेर