---Advertisement---

क्रिकेट इतिहासातील सर्वात महान वेगवान गोलंदाजाने दिला ‘स्पीडगन’ उमरानला कानमंत्र

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 11:52 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ पासून सातत्याने जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक चर्चेत आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने भारतीय गोलंदाजांतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी करत २२ बळी मिळवले होते. त्यानंतर त्याला आयर्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. तो आपल्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवू शकला नसला तरी, क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज असलेला ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा याने त्याला एक सल्ला दिला आहे.

उमरान सातत्याने १५० किमी प्रति तास इतक्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे त्याची गणना सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांत होत आहे. आयर्लंड व इंग्लंडविरुद्ध त्याला खेळण्याची संधी मिळाली होती. इथे तो फारसे बळी घेण्यात यशस्वी ठरला नाही. परिणामी त्याला संघाबाहेर व्हावे लागले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती असलेल्य ऑस्ट्रेलियाच्य ग्लेन मॅकग्रा याने नुकतेच एका मुलाखतीत वेगवान गोलंदाजांबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. उमरान मलिक याच्याविषयी विचारले असता तो म्हणाला,

“मी त्याला अजून समोर गोलंदाजी करताना पाहिले नाही. मात्र, जितके ऐकले आहे त्यावरून तो एक नैसर्गिक वेगवान गोलंदाज असल्याचे जाणवते. तुम्ही एखाद्याला गोलंदाजी कशी करायची हे शिकवू शकता. मात्र, वेग हा नैसर्गिक असतो आणि तो त्याच्याकडे आहे. त्याने लाईन लेन्थच्या जास्त भानगडीत पडून वेग कमी करता कामा नये.”

मॅकग्रा हा चेन्नईस्थित एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये भारतातील युवा वेगवान गोलंदाजांना प्रशिक्षण देत असतो. या कामी तो वर्षातून तीन वेळा भारतात येतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आमची भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाशी बरोबरीच होऊ शकत नाही’, खुद्द दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे भाष्य

‘सचिन तेंडूलकरला मी ओळखतच नव्हतो!’, शोएब अख्तरचा आणखी एक अजब दावा

शॉकिंग! मुंबई इंडियन्सच्या संघ मालकाला पुढील ३ तासांत संपवण्याची धमकी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---