सध्या इंग्लंडमध्ये व्हिटॅलिटी टी२० ब्लास्ट स्पर्धेचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत ग्लुस्टरशायर विरुद्ध ग्लामोर्गन क्रिकेट क्लब यांच्यात झालेला सामना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. याचे कारण असे की, ग्लुस्टरशायर क्लबकडून खेळणाऱ्या ग्लेन फिलिप्स याने तुफान फटकेबाजी केली. यासोबतच न्यूझीलंडच्या या फलंदाजाने एक आगळा वेगळा शॉट खेळला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ग्लुस्टरशायर विरुद्ध ग्लामोर्गन क्रिकेट क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात ग्लामोर्गन क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून ग्लुस्टरशायर संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. ग्लुस्टरशायर संघ ८६ धावांवर असताना २ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर ग्लेन फिलिप्सने तुफानी फटकेबाजी करत, विरोधी संघातील गोलंदाजांचा घाम काढला होता. त्याने अवघ्या ४१ चेंडूंमध्ये ९४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ६ षटकार आणि ९ चौकार लगावले होते. (Glenn Phillips plays astonishing shot in T20 blast for Gloucestershire, video went Viral on social media)
ग्लेन फिलिप्ससह बेन हॉवेलने देखील नाबाद ५३ धावांची खेळी केली होती. या दोन्ही फलंदाजांनी मिळून अवघ्या ६४ चेंडूंमध्ये १३० भागीदारी केली होती. या खेळीच्या जोरावर २० षटकअखेर ग्लुस्टरशायर संघाला २ गडी बाद २१६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना, ग्लामोर्गन क्रिकेट क्लब संघाला २० षटकअखेर ८ गडी गमावत १८२ धावा करता आल्या. ग्लुस्टरशायर संघाने हा सामना ३४ धावांनी आपल्या नावावर केला.
The most outrageous shot you will ever see 🤯@glenndominic159 shows all three stumps and then reverse scoops for 6!#Blast21 live: https://t.co/YlrUmoqCct pic.twitter.com/vb1lvGXepv
— Vitality Blast (@VitalityBlast) June 24, 2021
व्हायरल होत आहे व्हिडिओ
ग्लेन फिलिप्सने आपल्या ९४ धावांच्या खेळीदरम्यान, डेन डूथवेटच्या चेंडूवर उत्कृष्ट शॉट खेळला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फिलिप्सने हा शॉट खेळताना यष्टीपुढे न उभारता तो यष्टीपासून थोडा दूर उभा राहून फलंदाजी करत होता. डूथवेटने चेंडू टाकताच फिलिप्सने खाली वाकत जोरदार रिव्हर्स स्वीप शॉट खेळला. तो चेंडू बॅटला लागताच सीमारेषेच्या बाहेर गेला होता.
महत्वाच्या बातम्या-
एक पराभव अन् कोहलीवर टीकांचा वर्षाव, पण त्याची ‘ही’ कामगिरी भल्याभल्याची बोलती करेल बंद
ऐतिहासिक कसोटीतील पराभवानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय, इंग्लंड-श्रीलंकेला जाणार संघ निवडकर्ते!
अजिंक्यच्या कसोटी संघातील स्थानावर टांगती तलवार, ‘हे’ ३ खेळाडू घेऊ शकतात जागा