ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हीड वार्नरची ग्लोबल टी-20 लीगमध्ये विनीपेग हॉक्स संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली.
28 जूनपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत वार्नर विनीपेग हॉक्स संघाचे प्रतिनिधीत्व करतोय.
विनिपेग हॉक्स संघाचा कर्णधार वेस्टइंडीजच्या ड्वेन ब्रावोने या स्पर्धेतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली असल्याने त्याच्या जागी वार्नरची निवड करण्यात आला आहे.
बॉल टेंम्परींग प्रकरणात शिक्षा झालेला वार्नर मार्चनंतर प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये सहभागी झाला आहे.
या ग्लोबल टी-20 स्पर्धेतील तीन सामन्यात वार्नरला फक्त 6 धावा करता आल्या आहेत. असे असले तरी विनिपेग हॉक्स तीन सामन्यात दोन विजय मिळवून गुण तक्त्यात अव्वल स्थानी आहे.
यापूर्वी वार्नरने ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघाचे कर्णधार पद तर कसोटी आणि एकदिवसीय संघाचे उपकर्णधार पद संभाळले आहे.
तसेच वार्नरकडे आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबाद संघाच्या कर्णधार पदाचा अनुभव आहे. 2016 साली वार्नरच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैद्राबादने विजेतेपद मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात
-जगाला मिळणार दुसरा शेन वार्न, वय आहे फक्त ७ वर्षे