---Advertisement---

या क्रिकेटपटूने दारुच्या नशेत केला कार अपघात; झाली मोठी शिक्षा

---Advertisement---

ग्लूस्टरशायर क्लबचा कौऊंटी क्रिकेटपटू जॉर्ज हॅकिंसला दारुच्या नशेत कार अपघात केल्याच्या कारणाने अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला न्यायालयासमोरही हजर रहावे लागले.

२१ जुलै, मंगळवारी स्टेनस मॅजिस्ट्रेट न्यायालयात मद्यपान करुन गाडी चालविण्याच्या आरोपाखाली हंकिन्सला ६०० पौंड (सुमारे ५७,००० रुपये) दंड ठोठावण्यात आला आणि त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आले. १९ एप्रिल रोजी पोर्ट्समाउथ रोडवर त्याच्या कारचा अपघात झाला होता.

रात्री पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला आणि घटनास्थळावरील छायाचित्रांनुसार तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सुनावणीसाठी २३ वर्षीय हॅकिंसला न्यायालयात जावे लागले. एवढेच नाही तर ज्या वाहनांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या मालकांना पैसे देण्यास हॅकिंसला सांगण्यात आले आहे.

ग्लूस्टरशायर क्रिकेट क्लबने याबद्दल सांगितले की ‘आम्ही आमच्या खेळाडूच्या संपर्कात आहोत आणि त्याची संपूर्ण अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. ही सरे पोलिसांशी निगडीत बाब असल्याने क्लब सध्या याबद्दल अधिक प्रतिक्रिया देणार नाही.’

हॅकिंसने २०१६ मध्ये डरहम विरुद्ध ग्लूस्टरशायर क्रिकेट क्लबकडून पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत २८ प्रथम श्रेणी सामने, १५ अ दर्जाचे सामने आणि ७ ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणीमध्ये ९६१ धावा केल्या असून १३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ५३५ धावा केल्या आहेत. पण ट्वेंटी२०मध्ये मात्र त्याला केवळ १७ धावा करता आल्या आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी – 

ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यातून बेन स्टोक्स बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण

खांद्याला चेंडू लागल्यावर तेंडूलकरला दिले होते बाद, आज तसं करणारा अंपायर काय म्हणतोय पहा

२६ नाही १९ सप्टेंबरपासून होणार आयपीएल, रात्री ८ वाजता नाही तर अशावेळी होणार सामने सुरु

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---