भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडला नुकतीच परस्पर हितसंबंधी नोटीस पाठवण्यात आली आहे. द्रविड सध्या बंगळूरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. तसेच तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सची मालकी असलेल्या इंडिया सिमेंटमध्ये उपाध्यक्ष असल्याचे बीसीसीआयचे एथिक्स ऑफिसर यांना आढळून आले आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी याबद्दल तक्रार केली आहे. त्यानंतर बीसीसीआयचे लोकपाल तसेच एथिक्स ऑफिसर सेवानिवृत्त न्यायाधीश डीके जैन यांनी द्रविडला परस्पर हितसंबंध असल्याची मागील आठवड्यात नोटीस पाठवली आहे. यावर उत्तर देण्यासाठी द्रविडला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
मात्र अशी नोटीस द्रविडला पाठवण्यात आल्याने भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली भडकला असून त्याने परस्पर हितसंबंध ही भारतीय क्रिकेटमधील नवीन फॅशन असल्याचे म्हटले आहे.
गांगुलीने ट्विट केले आहे की ‘भारतीय क्रिकेटमधील नवीन फॅशन…परस्पर हितसंबंध…चर्चेत राहण्याचा सर्वोत्तम मार्ग… देवा भारतीय क्रिकेटची मदत कर… बीसीसीआयच्या एथिक्स ऑफिसरकडून परस्पर हितसंबंधाप्रकरणी द्रविडला नोटीस बजावण्यात आली.’
गांगुलीच्या या ट्विटला हरभजन सिंगने पाठिंबा दिला आहे. हरभजनने ट्विट केले आहे की, ‘खरंच? तूम्हाला याच्यापेक्षा(द्रविडपेक्षा) चांगला व्यक्ती भारतीय क्रिकेटसाठी मिळणार नाही. त्याच्यासारख्या दिग्गजांना नोटीस पाठवणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. चांगल्या गोष्टी होण्यासाठी क्रिकेटला त्यांच्या सेवेची गरज आहे. खरंच देवा भारतीय क्रिकेटला वाचव.’
2019 आयपीएलदरम्यान गांगुली, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही परस्पर हितसंबंधाप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२१ वर्षीय रिषभ पंतने मोडला एमएस धोनीचा हा खास विक्रम
–असा पराक्रम करणारा रिषभ पंत पहिलाच भारतीय क्रिकेटपटू!
–धोनी, रोहित पाठोपाठ कर्णधार कोहलीनेही केला हा खास पराक्रम