पुणे। पुण्याच्या शर्वरी इनामदार, गौरी शिंदे, श्रद्धा राठोड यांनी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदकाची कमाई केली.
पु. ना. गाडगीळ यांच्या सौजन्याने आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने सोमणस् हेल्थ क्लब व पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. डी. पी. रस्त्यावरील गोल्डन लीफ लॉन्स येथे ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतून लखनौ येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेतील वरिष्ठ महिलांच्या ५२ किलो गटात पुण्याच्या शर्वरी इनामदार हिने एकूण २९७.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. तिने स्क्वॅटमध्ये १००, बेंच प्रेसमध्ये ६२.५ आणि डेड लिफ्टमध्ये १३५ किलो वजन उचलले.
मुंबई उपनगरच्या उर्वी अशान (२६० किलो) आणि नेहा महाले (२६० किलो) यांनी अनुक्रमे रौप्यपदक आणि कांस्यपदक मिळवले. यानंतर ६३ किलो गटात पुण्याच्या गौरी शिंदेने स्क्वॅटमध्ये ११०, बेंच प्रेसमध्ये ५५ आणि डेड लिफ्टमध्ये १३५ किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली. ठाण्याच्या कीर्ती ब्रिदला (२७५ किलो) रौप्य, तर ममता साळवीला (२२७.५ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेतील ५७ किलो गटात पुण्याच्या श्रद्धा राठोडने एकूण २८० किलो वजन उचलले. तिने स्क्वॅटमध्ये १००, बेंच प्रेसमध्ये ५० आणि डेड लिफ्टमध्ये १३० किलो वजन उचलले. पुण्याच्या एकता विश्नोईला (२७० किलो) रौप्य, तर ठाण्याच्या हर्षदा बालचंदामीला (२३० किलो) कांस्यपदक मिळाले.
४७ किलो गटात ठाण्याच्या सुष्मिता देशमुखने (२६७.५ किलो) सुवर्ण, मुंबई उपनगरच्या फातेमा धुंडियाने (२३२.५ किलो) रौप्य, तर पुण्याच्या पूजा राठोडने (२२५ किलो) कांस्यपदक मिळवले.
सब-ज्युनियरमध्ये ४३ किलो गटात ठाण्याच्या शीतल कदमने (१६२.५ किलो), तर ४७ किलो गटात मुंबई उपनगरच्या खुशबू यादवने (१०५ किलो) सुवर्णपदक मिळवले. ५२ किलो गटात पुण्याच्या शालू प्रजापती (१७७.५ किलो) आणि ए. अहमद हिने (१५७.५ किलो) अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले.
६३ किलो गटात पुण्याच्या प्रशांती मूदमनसू हिने (१९७.५ किलो) सुवर्ण, मुंबई उपनगरच्या सेजल मकवानाने (१७५ किलो) रौप्य, तर रत्नागिरीच्या मधुरा हेडवकरने (१४७.५ किलो) कांस्यपदक मिळवले. ५७ किलो गटात रत्नागिरीच्या धनश्री महाडिकने (२१७.५) सुवर्ण, तर ठाण्याच्या प्रेरणा रवणे हिने (१९० किलो) रौप्यपदक मिळवले.
ज्युनियरमध्ये ४३ किलो गटात पुण्याच्या सेहेज महिनीने एकूण १७२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ठाण्याच्या माधुरी बोहरला (एकूण १२० किलो) मागे टाकले. ४७ किलो गटात ठाण्याच्या मुलींनी बाजी मारली. सुष्मीता देशमुखने (२६३.५ किलो) सुवर्ण, तर माहेश्वरी दांगेटीने (१५० किलो) रौप्यपदक मिळवले.
६३ किलो गटात ठाण्याच्या ममता साळवीने (२२७.५ किलो) पुण्याच्या अदिती परशेट्टीला (२२५ किलो) मागे टाकून सुवर्णपदकाची कमाई केली. अदितीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–३ वर्षाच्या मुलीने साडेतीन तासात मारले ११११ बाण
–एशियन गेम्स: कुस्तीपटू दिव्या काकरानने जिंकले कांस्यपदक
–बजरंग पुनियाने सुवर्णपदक केले अटल बिहारी वाजपेयींना समर्पित