झारखंडची राजधानी रांची येथे १५ वर्षांखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या युवा कुस्तीपटूंनी जोर दाखवला आहे. या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ओंकार शिंदे व सोहम कुंभार यांनी सुवर्ण पदक पटकावले. तसेच, महाराष्ट्र संघाला सांघिक उपविजेते पदाचा मानकरीही बनवले.
पदक विजेते कुस्तीगीर खालीलप्रमाणे-
४१ किलो – प्रणव घारे ( कास्य पदक ) हनुमान तालीम राशिवडे पै सागर चौगुले यांचा कडून प्रशिक्षण घेतो.
४४ किलो – सोहम कुंभार ( सुवर्ण पदक ) जय भवानी तालीम बानगे पै. रवींद्र पाटील यांचा कडून प्रशिक्षण घेतो.
५७ किलो – आरु खांडेकर ( रौप्यपदक ) श्रीराम कुस्ती संकुल ( म्हसवड – सातारा ) पै. महालिंग खांडेकर यांचा कडून प्रशिक्षण घेतो.
६२ किलो – तनिष्क कदम ( रौप्यपदक ) सह्याद्री कुस्ती संकुल ( पुणे ) विजय काका बराटे यांचा कडून प्रशिक्षण घेतो.
६८ किलो – अर्जुन गडेकर ( कास्य पदक ) भारतीय खेळ प्राधिकरण मुंबई साई पै.अजय सिंग, पै. अमोल यादव यांचा कडून प्रशिक्षण घेतो.
८५ किलो – ओंकार शिंदे ( सुवर्णपदक ) सह्याद्री कुस्ती संकुल ( पुणे ) विजय काका बराटे यांचा कडून प्रशिक्षण घेतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुण्याचा धीरज लांडगे करणार राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
सतरा वर्षांखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला ८ पदके; दोन मल्लांची ‘सुवर्ण’ कामगिरी