नुकतेच मुंबई येथे इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रेड कार्पेटवर अनेक इन्फ्लुएन्सर्स, खेळाडू आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे, भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याद्वारे आयोजित केल्या गेलेल्या या पुरस्कार सोहळ्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता म्हणजेच गोल्डन बॉय नीरज चोप्रा हादेखील सामील झाला होता.
इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 (Indian Sports Honours 2023) पुरस्कार सोहळ्यात नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने डान्स करत मैफील लुटली. नीरज हा स्वभावाने खूपच लाजाळू आहे. मात्र, या पुरस्कार सोहळ्यात नीरजने बिजली-बिजली गाण्यावर असा काही डान्स केला की, पाहणाराही पाहतच राहिला. नीरजने यावेळी काळ्या रंगाचा कोट आणि पँट परिधान करत सोहळ्याला हजेरी लावली होती. या वेशभूषेत तो खूपच डॅशिंग दिसत होता.
https://www.instagram.com/reel/CqKKMsxq6W4/?utm_source=ig_embed&ig_rid=82d64aa9-3f97-4356-8ec0-82dc4da5f69f
मात्र, या पुरस्कार सोहळ्यात सर्वात चर्चा त्याच्या डान्सची झाली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत नीरज चोप्रा हार्डी संधूच्या बिजली-बिजली (Neeraj Chopra Dance on Bijli-Bijli) गाण्यावर देसी ठुमके लावत आहे. नीरजसोबत या व्हिडिओत इन्फ्लुएन्सर रूही दोसानी (Roohi Dosani), यशराज मुखाते (Yashraj Mukhate) आणि दीपराज जाधव (Deepraj Jadhav) हेदेखील दिसत आहेत.
नीरजव्यतिरिक्त या सोहळ्यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone And Ranveer Singh) हे कलाकार जोडपेही उपस्थित होते. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये एक व्हिडिओ कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी याचाही आहे. या व्हिडिओत बस्सी विराट कोहलीच्या पाया पडताना दिसत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते की, आधी बस्सी विराट आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्याशी चर्चा करत असतो. त्यानंतर तो विराटच्या पाया पडतो आणि विराट मोठ्या मनाने त्याला मिठी मारतो. (golden boy neeraj chopra dancing on bijli bijli song in virat kohli award show video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी केला आपल्याच देशाच्या घातक वेगवान गोलंदाजांचा सामना, जॉर्डनने घेतली विकेट
कानाखाली मारल्याचे विसरून श्रीसंत IPL 2023मध्ये हरभजनसोबत करणार ‘हे’ काम, मिळाली खास जबाबदारी