पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत रोहनछाजेड याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाचा 6गडीराखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे ओव्हनफ्रेश टस्कर्स संघाला 6षटकात 3बाद 40धावापर्यंतच मजल मारता आली. यात श्रीनिवास चाफळकरने 14चेंडूत 21धावा व शिरीष आपटेने 10चेंडूत9धावा करून संघाच्या डावाला आकार दिला.गोल्डफिल्ड डॉल्फिन्सकडून रोहन छाजेड 1-4, अश्विन शाह 1-5, विश्वेश कुंभोजकर यांनीप्रत्येकी एक गडी बाद करून संघाच्या विजयाचा पाया रचला. 40धावांचे आव्हान गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाने 5.2षटकात 1बाद 41धावा करूनपूर्ण केले.यात रोहन छाजेडने सयंमपूर्ण फलंदाजी करत 23चेंडूत 1चौकारांच्या मदतीने नाबाद 24धावा करून संघाला विजय मिळवून दिला.रोहनला अश्विन शाहने 9धावा करून सुरेख साथ दिली.अंतिम सामन्याचा मानकरी रोहन छाजेड ठरला.
याआधीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत हर्षल गंद्रे नाबाद 50धावांच्या खेळीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने एनएच वुल्वस संघावर43धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. रोहन छाजेड नाबाद 41धावा व 1-5याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गोल्डफिल्डडॉल्फिन्स संघाने आर्यन स्कायलार्कसचा 58धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेतील विजेत्या गोल्डफिल्ड डॉल्फिन्स संघाला ज्ञानेश्वर आगाशे मेमोरियल करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिकवितरण इंडो शॉटलेचे अनिल जालिहाल, अजित खेर आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ. सुधीर भाटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रेखा आगाशे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे, क्लबच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, ब्रिहंसचे मंदारआगाशे, होडेकचे अभिजीत खानविलकर, कारा इंटलेक्टचे रणजीत पांडे, अभिषेक ताम्हाणे, सारंग लागू, कपिल खरे, तुषार नगरकर, देवेंद्र चितळे,निखिल शहा, शिरीष गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात बिनबाद 92धावा(हर्षल गंद्रे नाबाद 50(19,5×4,2×6), श्रीनिवा
गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 6षटकात बिनबाद 94धावा(अश्विन शाह नाबाद 47(19,4×4,3×6), रोहन छाजेड नाबाद 41(17,3×4,3×6)) वि.वि.आर्
अंतिम फेरी:
ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात 3बाद 40धावा(श्रीनिवास चाफळकर 21(14,1×6), शिरीष आपटे 9(10), हर्षल गंद्रे 6, रोहन छाजेड 1-4, अश्विनशाह 1-5, विश्वेश कुंभोजकर 1-7)पराभूत वि.गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 5.2षटकात 1बाद 41धावा(रोहन छाजेड नाबाद 24(23,1×4), अश्विन शाह9(10));सामनावीर–रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन्स 6गडी राखून विजयी.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: रोहन छाजेड(233धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: श्रीनिवास चाफळकर(7विकेट);
मालिकावीर: रोहन छाजेड(233धावा);
मोस्ट डिसिप्लीन टीम: रेड बुल्स;
मोस्ट स्पोर्टिंग टीम: टायगर्स;
मोस्ट व्हॅल्युएबल वरिष्ठ खेळाडू: देवेंद्र चितळे(144धावा);
मोस्ट सुपर वरिष्ठ खेळाडू: राजेश कासट;
मोस्ट व्हॅल्युएबल कुमार खेळाडू: असिम देवगावकर;
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: कर्णा मेहता;
उत्कृष्ट यष्टीरक्षक: आशुतोष आगाशे.