---Advertisement---

इंग्लंडचा सर्वकालीन दिग्गज फलंदाज म्हणतो विराटपासून इंग्लंडला धोका

On: रविवार, जुलै 29, 2018 10:02 AM
---Advertisement---

इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज ग्रॅहम गुच यांनी इंग्लडला  विराट कोहलीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

१ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरवात होत आहे.

विराट त्याची इंग्लंडमधील कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे विराटकडे दुर्लक्ष केल्यास ते इंग्लंडला महागात पडू शकते. असे मत ग्रॅहम गुच यांनी बीसीसीआयच्या संकेतस्थळाशी बोलताना व्यक्त केले आहे.

“विराट सध्या जगातील अव्वल फलंदाजांपैकी एका आहे. त्यामुळे इंग्लंडला सर्वात जास्त धोका विराटकडूनच आहे. २०१४ च्या इंग्लंड  दौऱ्यात विराटची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे या दौऱ्यात तो सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आतुर आहे.” असे ग्रॅहम गुच म्हणाले.

ग्रॅहम गुच यांनी पुढे विराट कोहली आणि इंग्लिश कर्णधार जो रुट यांच्या खेळाविषयीसुद्धा भाष्य केले.

“मला वाटते विराट आणि रुट दोघेही सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. ते दोघेही मॅच विनर फलंदाज आहेत. मला दोघांचीही फलंदाजी पाहताना आनंद होतो. त्यामुळे विराट आणि रुटमध्ये तुलना करण्यात काही अर्थ नाही.” असे ग्रॅहम गुच म्हणाले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

सौरव गांगुलीने दिल्या इम्रान खानला शुभेच्छा!

हार्दिक पंड्याच्या कसोटी पदार्पणाला झाले एक वर्ष पूर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment