आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात चांगली झालेली नाही. या संघाने आतापर्यंत स्पर्धेतील दोन सामने गमावले आहेत. संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर असल्यामुळे संघाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ग्रस्त आहे, जी दुखापत त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान झाली होती. एमआय संघाचे हेड कोच महेला जयवर्धन यांनी अपडेट दिली आहे की, जसप्रीत लवकरच रिकव्हर होत आहे. मुंबई इंडियन्ससाठी चांगली गोष्ट आहे जसप्रीत बुमराहने गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे.
जसप्रीत बुमराह मागच्या काही आठवड्यांपासून बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सेलेन्स मध्ये राहत आहे. तिथे तो मेडिकल टीमच्या निदर्शनाखाली आहे. यामध्येच एक मोठी अपडेट समोर आली आहे की, बुमराहने नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे. तो आत्ताही बंगळूरूच्या नॅशनल क्रिकेट ॲकॅडमीमध्ये आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे हेड कोच महेला जयवर्धन यांनी जसप्रीत बुमराच्या फिटनेस वर अपडेट देत सांगितले की, तो लवकरच ठीक होईल. तसेच बुमराहच्या पुनरागमनाची तारीख जाहीर झाली नाही, मात्र चर्चा उपस्थित होत आहेत की जसप्रीत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई इंडियन्स संघाचा कॅम्पमध्ये जॉईन होईल. त्यासोबत हा देखील दावा केला जात आहे, की 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध तो सामना खेळू शकतो.
जसप्रीत बुमराहने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 बद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 13 सामन्यात 20 विकेट्स घेतल्या होत्या. तो स्पर्धेतील मुंबई संघासाठी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज आहे. सध्या मुंबई इंडियन्स संघ पॉइंट्स टेबलवर शेवटच्या स्थानी आहे.






