येत्या एप्रिल-मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा थरार भारतात रंगणार आहे. ही स्पर्धा मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, बंगळूरू आणि कोलकाता या ठिकाणी खेळवण्यात येऊ शकते. अशातच आयपीएल २०२१ चे जेतेपद जिंकण्यासाठी सर्वच संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच जर तुम्ही चेन्नई सुपर किंग्स संघाचे समर्थक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
मागीलवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला मैदानात खेळताना पाहण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक आहेत. अशातच येत्या ११ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे सराव शिबिर सुरू होणार आहे. या शिबिरासाठी एमएस धोनी पहिल्या दिवसापासूनच उपस्थित राहणार असल्याची चर्चा होत आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाच्या एका अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “एमएस धोनी प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या दिवसापासूनच संघासोबत असणार आहे. खेळाडूंची उपस्थिती आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. अपेक्षा आहे की, सर्व खेळाडू कोविड -१९ नियमांचे पालन करतील. तसेच सर्व खेळाडूंना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.”
ऋतुराज गायकवाडकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत चेन्नई संघाला ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अशातच येत्या आयपीएल स्पर्धेत चाहत्यांना चेन्नई संघाकडून चाहत्यांना चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे. गतवर्षी, फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रात संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, शेवटच्या ३ सामन्यात सलग ३ अर्धशतकं झळकावत ऋतुराज गायकवाडने सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याच्याकडून संघाला यंदाच्या हंगामात चांगली सुरुवात मिळवून देण्याची अपेक्षा असणार आहे. ऋतुराज सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळत आहे.
आयपीएल २०२१ साठी चेन्नई सुपर किंग्स संघ
एमएस धोनी (कर्णधार) , फाफ डू प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्रावो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सँटनर, इम्रान ताहिर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गिडी, जोश हेजलवुड, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध सलग दोन पराभवांनंतर चौथ्या कसोटीआधी इंग्लंड संघात झाले ३ मोठे बदल
राहुल नाम तो सुना होगा ! त्याच्या एकट्यासाठी घेतली गेली होती भल्यामोठ्या स्टेडियमवर ट्रायल