---Advertisement---

सरकारने घेतले दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड ताब्यात, नक्की काय आहे प्रकरण

On: शुक्रवार, सप्टेंबर 11, 2020 2:03 PM
---Advertisement---

मुंबई । दक्षिण आफ्रिकेत ऑलिम्पिक संबंधित संस्थेने दक्षिण आफ्रिका क्रिकेट (सीएसए) बोर्डास निलंबित करून देशाचे क्रिकेट ताब्यात घेतले आहे. वृत्तानुसार, मंडळाच्या अंतर्गत भांडणामुळे सरकारने क्रिकेट बोर्डाला स्थगिती दिली आणि क्रिकेट ऑपरेशनचा ताबा घेतला. या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या मान्यताला धोका निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका संघाची मान्यता आयसीसी काढून घेऊ शकते. असे झाल्यास ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर पडतील.  क्रिकेट वेबसाइट क्रिकेटबझच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आफ्रिका क्रीडा संघ आणि ऑलिंपिक  समितीने वरिष्ठ अधिकार्‍यांन‍ा बोर्डाच्या कारभारातून पायउतार होण्यास सांगितले. एसएएससीओसीच्या म्हणण्यानुसार, सीएसए गेल्या वर्षी डिसेंबरपासून गैरव्यवस्थापन आणि गैरवर्तन करीत आहे. याची चौकशी करण्यात आली असून त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या पत्रात एसएएससीओसीने सीएसएला सांगितले आहे की, “या घटनांमुळे तुमचे सदस्य, माजी सदस्य, राष्ट्रीय संघ सदस्य, भागधारक, प्रायोजक आणि क्रिकेट प्रेमींच्या चिंता वाढल्या आहेत. या घटनांमधून जनता, भागधारक, प्रायोजक आणि खेळाडूंचा क्रिकेटवरील विश्वास उडाला यात काही शंका नाही.  या सर्व गोष्टींमुळे क्रिकेटची प्रतिमा खराब झाली आहे.”

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---