चीनमधील हॅंगझू येथे 19 व्या एशियन गेम्सचे शनिवारी (13 सप्टेंबर) उद्घाटन झाले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ही स्पर्धा सुरू होत असल्याची अधिकृत घोषणा केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन व भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी भूमिका बजावली.
Team India at the Asian Games Opening ceremony ❤️ #IndiaAtAsianGames pic.twitter.com/MD4x443ttj
— India_AllSports (@India_AllSports) September 23, 2023
ही स्पर्धा मागील वर्षी होणे अपेक्षित होते. मात्र, कोविडच्या सावटानंतर यावर्षी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. उद्घाटन समारंभात संपूर्ण जग एका नवीन युगात प्रवेश करताना दाखवण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खुबीने वापर केला गेला होता. याशिवाय आशियाई देशांमधील मैत्री, प्रेम आणि एकता दाखविण्याचा प्रयत्न या सोहळ्यात करण्यात आला. उद्घाटन समारंभाची थीम हॅंगझू शहरातून जाणार्या कियानटांग नदीवर आधारित होती. तब्बल दोन तास चाललेल्या या सोहळ्यात चीनच्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचे चित्रण करण्यात आले. हे सर्व एका उत्कृष्ट लाईट शोच्या माध्यमातून दाखवले गेले.
या सोहळ्यात महिला खेळाडूंनी सोनेरी रंगाची साडी तर पुरुष खेळाडूंनी सोनेरी रंगाचा कुर्ता, निळ्या रंगाचा पायजमा आणि नेहरू जॅकेट परिधान केले होते. भारतातील एकूण 655 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. भारताने या खेळांसाठी आपले महिला आणि पुरुष दोन्ही संघ पाठवले आहेत.
(Grand Opening Ceremony Of Hangzhou Asian Games 2023 Lovlina Borgohein And Harmanpreet Singh Lead Team India)
महत्वाच्या बातम्या –
खेळाडू वृत्ती! बांगलादेश-न्यूझीलंड सामन्यात फॅमिली वाली फिलिंग, लिटन दासचा धाडसी निर्णय
न भूतो…! विश्वचषक स्पर्धांमध्ये खणकलंय शाकिबचं नाणं, ‘हा’ भीमपराक्रम करणारा बांगलादेशचा एकमेव धुरंधर