ऑस्ट्रेलियात होणारा टी20 विश्वचषक सुरू होण्यासाठी अवघा दोन आठवड्यांचा शिल्लक राहिला आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जातेय. अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होईल. भारतीय फलंदाजीची धुरा स्वतः रोहितच्या खांद्यावर असेल. भारतीय चाहत्यांप्रमाणेच आता विदेशी समीक्षकांना देखील रोहितकडून भरपूर अपेक्षा आहेत. इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू आणि समालोचक ग्रॅमी स्वानने आता रोहितबाबत भविष्यवाणी केली आहे.
ग्रॅमी स्वानने नुकतीच एका भारतीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विश्वचषकातील भारतीय संघाचे आव्हान व भारतीय खेळाडूंविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये रोहित शर्माबाबत बोलताना त्याने मोठे विधान केले. तो म्हणाला,
“मला वाटते की रोहित शर्मा या विश्वचषकात शतक ठोकेल. त्याच्याकडे ती क्षमता नक्कीच आहे.”
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी फलंदाज आहे. विशेष म्हणजे तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने सर्वाधिक 4 षटके ठोकलीत. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तो शानदार फॉर्ममध्ये दिसला होता.
स्वानने या मुलाखतीत भारताचा अनुभव फलंदाज विराट कोहली याच्याबद्दल देखील आपले मत नोंदवले. तो म्हणाला,
“भारतीय संघाला विराट कोहलीच्या चांगल्या कामगिरीची गरज आहे. मला स्वतःला देखील वाटते की त्याने उत्कृष्ट खेळ दाखवावा. कारण, त्यांच्या खेळावर बरेच काही अवलंबून असते. लोक त्यांच्यासाठी देखील खेळ पाहतात. ते खराब खेळले तर टीव्हीवर सामना पाहणाऱ्या लोकांचा भ्रमनिरास होतो.”
भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मेलबर्न येथे करेल. तत्पूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध सराव सामने देखील खेळायचे आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर चाहत्यांची इच्छा झाली पूर्ण! विदेशी लीग खेळणार रैना
“बाबर अपयशाला घाबरतो!’; माजी भारतीय खेळाडूची खरमरीत टीका
इरफानच्या मुलालाही कळाली वडिलांची बॅटिंग, पाहा सचिनने विचारलेल्या प्रश्नावर काय म्हणाला इमरान