बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जातोय. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. रहाणेने दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकत, भारताला मजबूत स्थितीत आणले. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ काहीसा लवकर थांबला. मात्र, खेळपट्टी झाकण्यासाठी मैदान कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. त्याचा एक मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
मैदान कर्मचाऱ्याने मारला सूर
मेलबन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. मात्र, संपूर्ण दिवसात तीन वेळा सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. दिवसाचा खेळदेखील पाऊस आल्यामुळे थांबवावा लागला. भारतीय डावाच्या ९२ व्या षटकात अचानक पाऊस आल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला. त्यावेळी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली.
खेळपट्टी झाकण्यासाठी सर्व मैदान कर्मचारी मैदानात दाखल झाले. त्याच दरम्यान वाऱ्याचा वेग वाढला आणि कव्हर्स उडू लागले. त्यावेळी, एका कर्मचाऱ्याने सूर मारत तो कव्हर पकडून ठेवला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
Not the scenes we want to see – but a stellar effort from this groundsman! #AUSvIND pic.twitter.com/p77mxSd3Jo
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2020
भारताने गाजवले दुसऱ्या दिवसावर वर्चस्व
पहिल्या दिवशीच्या एक बाद ३६ या धावसंख्येवरून पुढे खेळताना भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ दाखवला. पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलने ४५ धावांची खेळी केली. चेतेश्वर पुजारा(१७), हनुमा विहारी(२१) व यष्टीरक्षक रिषभ पंत(२९) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणेने जबाबदारीने खेळत एक दर्जेदार नाबाद शतक ठोकले. तो १०४ धावांवर आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील नाबाद ४० धावांवर खेळतोय. भारताकडे पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाखेर ८२ धावांची आघाडी होती.
भारतीय गोलंदाजांनी केली होती सुरेख कामगिरी
भारतीय गोलंदाजांनी कसोटीच्या पहिल्या दिवशी सुरेख कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १९५ धावांवर गुंडाळला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताकडून सर्वाधिक ४ बळी मिळवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं! ‘हा’ मोठा खेळा़डू तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
‘या’ खेळाडूला धावताना झाली होती दुखापत, आता झाला दोन आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर
गावसकरांनी केली रहाणेची स्तुती; म्हणाले…