---Advertisement---

फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ या गटात

---Advertisement---

मुंबई । उद्यापासून सुरु होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी काल महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा झाली. आज हे संघ कोणत्या गटातून खेळणार याचेही चित्र स्पष्ट झाले आहे.

रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या पुरुषांचा संघ अ गटातून खेळणार असून या गटात महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश हे संघ आहेत. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर अंतिम फेरीत पराभूत झालेला सेनादल या स्पर्धेत ब गटात आहे. ब गटात सेनादल, कर्नाटक, उत्तराखंड, भारतीय रेल्वे हे चार दिग्गज संघ आहेत.

सायली जाधवच्या नेतृत्वाखालील महाराष्टरचा महिलांचा संघ या स्पर्धेत ब गटात खेळत असून या गटात भारतीय रेल्वे, हरयाणा, केरळ हे अन्य संघ आहेत. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा हिमाचल प्रदेशचा संघ अ गटात असून पंजाब, उत्तर प्रदेश, छत्तीसगड हे संघ या गटातून लढताना दिसतील.

फेडरेशन कपमधील पुरुष आणि महिला संघाची विभागी दोन गटात केलेली आहे ती खालील प्रमाणे –
पुरुष गट
अ गट – महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश
ब गट – सेनादल, कर्नाटक, उत्तराखंड, भारतीय रेल्वे

महिला गट
अ गट – हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, छत्तीसगड
ब गट – भारतीय रेल्वे, हरयाणा, केरळ, महाराष्ट्र

https://twitter.com/Maha_Sports/status/961542120787070976

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment