शुक्रवारी (दि. ०६ मे) आयपीएल २०२२मधील ५१वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळला गेलेला हा सामना गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याच्यासाठी खास होता. कारण, त्याने आतापर्यंत ७ हंगामात मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान मुंबई ४ वेळा किताब जिंकण्यात यशस्वी राहिला. यामध्ये पंड्यानेही मोलाचा वाटा उचलला होता. त्याने १४००हून अधिक धावा करण्यासोबतच मुंबईसाठी ४२ विकेट्सही घेतल्या होत्या. मात्र, या हंगामात तो पहिल्यांदा आपल्या जुन्या संघाविरुद्ध खेळताना दिसला.
या सामन्यापूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने मुंबई इंडियन्स संघासोबतच्या (Mumbai Indians) आपल्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. याच्याशी संबंधित एक व्हिडिओ गुजरात टायटन्स संघाने (Gujarat Titans) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
पंड्याला या खेळाडूला आपल्या संघात सामील करायचंय
या व्हिडिओत पंड्याने खुलासा केला आहे की, नुकतेच त्याची जुना संघसहकारी आणि मुंबई इंडियन्स संघाचा दिग्गज अष्टपैलू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्याशी चर्चा झाली होती. यामध्ये तो मजेत पोलार्डला म्हणाला होता की, “तुला नाही माहिती, पुढच्या वर्षी तू आमच्या संघात येऊ शकतो. ही माझी इच्छा आहे. मात्र, मला माहितीये की, असे कधीही होणार नाही.”
A tale of two colours – blue and golden – in the words of #PapaPandya ????
???? Captain relives his MI memories before the clash of the day #GTvMI@hardikpandya7 #SeasonOfFirsts #AavaDe pic.twitter.com/4ZNe7Gh69v
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 6, 2022
“मुंबईसोबतचा माझा प्रवास यादगार राहिला”
गुजरात संघाने शेअर केलेल्या व्हिडिओत पंड्या पुढे बोलताना म्हणाला की, “मी नेहमीच स्वत:ला निळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सीमध्ये पाहिले आहे. मात्र, मी आपल्या गृहराज्यासोबतही निळ्या आणि सोनेरी रंगाच्या जर्सीतच आहे, जे माझ्यासाठी आणखीही खास आहे. मला आजही आठवते की, कशाप्रकारे चेन्नईविरुद्धच्या एका सामन्यात आम्ही २ षटकात ३२ धावांची आवश्यकता असताना मी ३ षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा मी देखील यशाची चव चाखली होती. माझ्या मुंबई इंडियन्ससोबत खूप साऱ्या आठवणी आहेत. ज्या आजही माझ्यासोबत आहेत.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यंदा पोलार्डची बॅट काही चालेना
कायरन पोलार्डला मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केले होते. मात्र, त्याला या हंगामात खास कामगिरी करता आली नाहीये. त्याची बॅट या हंगामात चालत नाहीये. मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या पोलार्डने ९ सामन्यात २०हून कमी सरासरीने फक्त १२५ धावा केल्या आहेत.
गुणतालिकेतील स्थान
एकीकडे गुणतालिकेत गुजरात अव्वलस्थानी आहे, तर पाच वेळचा आयपीएल विजेता मुंबई संघ १०व्या स्थानी आहे. तसेच, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेरही पडला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी म्हतारा होतोय’, सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर असं का म्हणाला वॉर्नर, वाचा सविस्तर






