---Advertisement---

विश्वासच बसत नाहीये! गुजरातने एकाही सामन्यात केले नाही ‘हे’ काम, तरीही जिंकली ट्रॉफी

On: सोमवार, मे 30, 2022 7:32 PM
Gujarat-Titans-IPL-2022
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२मध्ये चमकदार कामगिरी करण्यासोबतच गुजरात टायटन्सने अंतिम फेरीत धडक मारली. गुजरातने राजस्थान संघाचा ७ गडी राखून पराभव करत पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावले. यासह गुजरातने या हंगामात अनेक चमत्कार केले. त्यामधील एक चमत्कार असा आहे ज्यावर लगेचच कोणाचाही विश्वास बसणार नाही.

संपूर्ण हंगामात आपल्या फलंदाजीचे वर्चस्व राखणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघाने यावर्षी एकाही सामन्यात २०० किंवा अधिक धावा काढलेल्या नाहीत. या हंगामात गुजरात एकूण १४ साखळी आणि २ प्ले-ऑफचे सामने असे एकूण १६ सामने खेळला आहे. या १६ सामन्यांत एकादाही संघाला २०० पेक्षा जास्त धावा काढता आल्या नाही. बऱ्याचदा संघ प्रथम गोलंदाजी करत असताना विरुद्ध संघाला २०० पेक्षा कमी धावात रोखण्यात यशस्वी झाला असला, तरी प्रथम फलंदाजी करत असताना देखील संघाला २०० धावा काढता आल्या नाहीत, हा एक अनोका विक्रम आहे.

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. . . आरसीबीच्या पदरी पुन्हा अपयशच!!! RCB VS RR | RCB LOST | CHOKER | IPL

यंदाच्या वर्षी १६ सामन्यांपैकी ५ सामन्यात गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, त्या संधीचे सोने करत गुजरातला २०० पेक्षा अधिक धावा काढण्यास अपयश आले आहे. गुजरातने यंदाच्या हंगामात एका सामन्यात सर्वाधिक १९२ धावा काढल्या आहेत. गुजरात टायटन्स हा संघ आयपीएलच्या एका हंगामात एकाही सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा न करणाऱ्या संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, गुजरातने एकाही सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा बनवल्या नसल्या, तरी गुजरात आयपीएल चषक उंचावण्यात यशस्वी ठरले आहे. याबाबत सगळीकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आयपीएल ट्रॉफी बनवायला चक्क 'इतके' कोटी रुपये खर्च आला होता | IPL Trophy | Champion Trophy Cost

व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अश्विन महान क्रिकेटर, पण गोलंदाजीत ‘या’ सुधारणेही आहे गरज; कुमार संगकाराचा कडवा सल्ला

धोनीच्या ‘त्या’ विक्रमाची ११ वर्षांनंतर गिलकडून पुनरावृत्ती

आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---