---Advertisement---

ये ब्रोमान्स है! फायनलमध्ये पोहोचताच गिलला किस करण्यासाठी धावला मिलर, पंड्यानेही लावला नंबर; Photo

On: शनिवार, मे 27, 2023 8:23 PM
David-Miller-And-Hardik-Pandya-And-Shubman-Gill
---Advertisement---

गुजरात टायटन्स संघाने आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे मुंबई इंडियन्स संघाला 62 धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी सलग दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एन्ट्री केली. गुजरातच्या या विजयाचे शिल्पकार शुबमन गिल आणि मोहित शर्मा हे दोघे ठरले. या सामन्यातील कामगिरीसाठी गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, सामन्यानंतर संघसहकाऱ्याने गिलला किसदेखील केली. यादरम्यानचा फोटोही तुफान व्हायरल होत आहे.

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिल (Shubman Gill) याच्या 129 धावांच्या मदतीने 3 विकेट्स गमावत 233 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघाचा डाव 18.2 षटकात 171 धावांवर संपुष्टात आला. गुजरातसाठी यावेळी मोहित शर्मा (Mohit Sharma) याने शानदार गोलंदाजी करत 2.2 षटकात 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, शुबमन गिल यानेही शानदार शतक झळकावत सामनावीर पुरस्कार पटकावला.

मिलरने गिलला केले किस
गिलचे हे हंगामातील तिसरे शतक होते. त्याच्या या शतकाच्या जोरावर गुजरातला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यात यश आले. गिलच्या या खेळीवर डेविड मिलर (David Miller) भलताच खुश झाला. गुजरातने विजय पक्का करताच मिलर धावत आला आणि गिलला पाठीमागून मिठी मारली. त्यानंतर मिलरने गिलला किस केली. शुबमन गिल आणि डेविड मिलर (Shubman Gill And David Miller) यांच्यातील हा ब्रोमान्स आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. गिलला किस करतानाचा मिलरचा फोटोही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

गिलच्या शानदार फलंदाजीने विजय मिळाल्याचा आनंद फक्त मिलरनेच नाही, तर संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही व्यक्त केला. पंड्याही स्वत:ला गिलला किस करण्यापासून रोखू शकला नाही.

गुजरातच्या खेळाडूंनी आनंदाच्या भरात इतर खेळाडूंना किस करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही पंड्याने मिलरला गालावर किस केली आहे. या फोटोवरून दिसते की, गुजरात संघात किती बंधूभाव आहे. (gt vs mi david miller kisses cricketer shubman gill bromance in gujarat titans match winning moments)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर सचिनला भेटला शुबमन, मास्टर ब्लास्टरने हळूच कानात काय सांगितलं? पाहा फोटो
‘हेच’ ते 5 खेळाडू, ज्यांच्यामुळे मुंबईचा झाला लाजीरवाणा पराभव; तिसरे नाव वाचून तुम्हालाही येईल राग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---