आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. तर या सामन्यात शुबमन गिल गुजरात टायटन्सचे तर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व या हंगामात रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांना आपापल्या संघाने विजयाने या हंगामाची सुरुवात करावी अशी अपेक्षा आहे. पण या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक मोठे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चेना उधाणं आलं आहे.
याबरोबरच आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवले होते. त्यानंतर आता रोहित शर्माही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. यापूर्वी अहमदाबादच्या मैदानावर सराव केल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला आहे की, माझ्यासाठी तयारी ही नेहमी महत्त्वाची असते आणि त्यामुळे कोणत्याही खेळापूर्वी मला खूप आत्मविश्वास मिळत असतो.
त्यानंतर पुढे बोलताना रोहित शर्मा म्हणाला आहे की, लिलावात बरेच नवीन खेळाडू सहभागी झाले होते यामधील तरुण खेळाडू, ज्यांनी देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मी त्याची वाट पाहत आहे आणि आशा करतो की तो सुरुवातीपासूनच आयपीएलच्या 17 व्या हंगामात त्याची छाप पाडतील.
अशातच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे, रोहित शर्मा 11 वर्षानंतर नॉन-कर्णधार म्हणून फ्रँचायझीसाठी पहिला सामना खेळणार आहे. तसेच रोहित शर्माने कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवले आहे.
https://twitter.com/mipaltan/status/1771817097917612137
दरम्यान, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवल्यानंतर मुंबई इंडियन्सला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. याशिवाय सोशल मीडियावर बराच वाद विवाद देखील पहायला मिळाला होता. मात्र आता हा वाद संपुष्टात आला असून सामन्यापूर्वी रोहित आणि हार्दिक मिठी मारताना पहायला मिळाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-