पुणे: पहिल्या अल्टिमेट खो खो स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात गुजरात जयंट्स संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 47-42 असा पराभव करताना विजयी समारोप केला.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत वझीर अभिनंदन पाटील ने 8 गुण मिळवून गुजरातच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, राजस्थानकडून कर्णधार मझहर जमादारने 7 गुण मिळवून एकाकी झुंज दिली.
राजस्थान वॉरियर्सने गुजरातला चुरशीची झुंज दिली.परंतु प्ले ऑफ मधील आधीच स्थान निश्चित केलेल्या गुजरातने सामन्यावरील वर्चस्व कायम राखले. सागर पोतदारने 3मिनिटे 21सेकंद खेळ करताना 4बोनस गुणांची कमाई केल्याने तिसऱ्या सत्राअखेर त्यांनी राजस्थानला 18 गुणांवर रोखले होते.त्यामुळे अखेरच्या सत्रात केवळ 13 गुणांचा बचाव करण्याचे आव्हान राजस्थान समोर राहिले.
निलेश पाटील ने गुजरातला 2मिनिटे बाकी असतानाच विजयी आघाडी मिळवून देताना याल्ला सतीश याला पोल डाईव्ह वर बाद केले. त्यानंतर गुजरातने लगेचच विजय निश्चित केला.
त्याआधी राजस्थानने पहिल्या सत्राअखेर गुजरात च्या आठ खेळाडूंना बबाद करून 20-02 अशी आघाडी घेतली होती. अक्षय गणपुळेने दुसरी सत्रात 2मिनिटे 45सेकंद खेळ करताना 2बोनस गुणांसह राजस्थानकडून झुंज दिली.तरीही गुजरातने मध्य तरला 23-22अशी आघाडी राखली होती.हीच आघाडी कायम राखत त्यांनी साखळी स्पर्धेत विजयाचा समारोप केला.
आज रात्री अखेरच्या साखळी सामन्यात तेलगु योद्धाज विरुद्ध ओडिशा जगरनट्स यांच्यात होणार आहे.
अमित बर्मन यांनी पुरस्कृत केलेल्या अखिल भारतीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचे प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ही लीग पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. सोनी टेन 1 (इंग्रजी), सोनी टेन 3 (हिंदी आणि मराठी), सोनी टेन 4 (तेलुगु आणि तमिळ) चॅनेलवरून अल्टीमेट खो खोचे थेट कव्हरेज दररोज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू प्रसारित करण्यात येणार आहे. लीग प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म, सोनी लाईव्हवर लाइव्ह-स्ट्रीम देखील करण्यात येणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार