इंडियन प्रीमिअर लीग 2023चा हंगाम संपला असून चाहते आता तमिळनाडू प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा आनंद घेत आहेत. या लीगची सुरुवात होऊन आठवडा उलटला आहे. यादरम्यान 21 वर्षीय फलंदाज बॅटमधून आग ओकताना दिसत आहे. या फलंदाजाने आयपीएल 2023 हंगामात ट्रेलर दाखवला होता, पण टीएनपीएल स्पर्धेत तो आख्खा चित्रपट दाखवत आहे. ज्या वेगाने हा फलंदाज धावा करत आहे, ते पाहून तो लवकरच भारतीय संघाचे तिकीट मिळवेल अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.
टीएनपीएल 2023 (TNPL 2023) हंगाम गाजवत असलेला फलंदाज इतर कुणी नसून तमिळनाडूचा डावखुरा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudarshan) आहे. त्याने आयपीएल 2023 हंगामाच्या अंतिम सामन्यात ज्या अंदाजात फलंदाजी केली होती, अगदी त्याच अंदाजात तो टीएनपीएल स्पर्धेत खेळत आहे. सुदर्शनने आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 47 चेंडूत 96 धावांची वादळी खेळी साकारली होती. त्याने या खेळीत 6 षटकार आणि 8 चौकारांचा पाऊस पाडला होता. आता टीएनपीएलमध्येही तो याच अंदाजात लायका कोवई किंग्स संघाकडून फलंदाजी करत आहे.
चेपॉकविरुद्ध झळकावले अर्धशतक
साई सुदर्शन याने चेपॉक सुपर गिलीजविरुद्ध डिंडीगुल येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील नवव्या सामन्यात 127 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 43 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने 1 षटकार आणि 9 चौकार मारले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर कोवई किंग्स संघाने 21 चेंडू शिल्लक ठेवत 8 विकेट्सने सामना नावावर केला. टीएनपीएलच्या सलग तिसऱ्या सामन्यात सुदर्शनने अर्धशतक ठोकले आहे.
Is there a way to stop this run machine? ????#TNPL2023#lkkvscsg#TNPLonstarsports#TNPLonfancode#NammaAatamAarambam????#NammaOoruNammaGethu???????? pic.twitter.com/oQPS2UVfOe
— TNPL (@TNPremierLeague) June 19, 2023
टीएनपीएलमधील अर्धशतकाची हॅट्रिक
सुदर्शनने या हंगामातील पहिल्या सामन्यापासून आपला दम दाखवला होता. त्याने आयड्रीम तिरुप्पूर तमिजंस संघाविरुद्ध 45 चेंडूत 86 धावांची खेळी साकारली होती. यानंतर नेल्लई रॉयल किंग्सविरुद्ध 52 चेंडूत 90 धावा चोपल्या होत्या आणि आता चेपॉक सुपर गिलीजविरुद्ध अर्धशतक ठोकले.
भारतीय संघात मिळू शकते संधी
साई सुदर्शनने 6 महिन्यापूर्वीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावांचा पाऊस पाडत आहे. जर तो अशीच कामगिरी करत राहिला, तर त्याला भारताच्या टी20 संघात एन्ट्री करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. तो आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सकडून खेळतो. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आहे. सध्या भारतीय टी20 संघाची धुराही पंड्याच्या हातात आहे. अशात पंड्याला या पॉवर हिटरच्या खेळाविषयी आणि त्याच्या प्रतिभेविषयी चांगली माहिती आहे. अशात सुदर्शनला संधी मिळू शकते. (gujarat titans batsman sai sudharasn after 96 run knock in ipl 2023 final scored 3 half centuries in tnpl 2023)
महत्वाच्या बातम्या-
जडेजाने शेअर केला ‘फॉरएव्हर क्रश’सोबतचा फोटो; नेटकरीही म्हणाला, ‘भावा, घोड्याला जोरात…’
नाद केला पण पुरा केला! कसोटी क्रिकेटमध्ये 11168 धावा करून पहिल्यांदाच Stump Out झाला रूट, पण…