सोमवारी (दि. 15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल 2023चा 62वा सामना खेळला गेला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात गुजरात संघाने 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरात संघाने आयपीएल 2023 च्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. सलग दुसऱ्या वर्षी गुजरातने आयपीएल प्ले ऑफसाठी पहिल्यांदा पात्र होण्याचा कारनामा करून दाखवला.
आपल्या घरच्या मैदानावर अखेरचा साखळी सामना खेळत असलेल्या गुजरातने जबरदस्त सांघिक खेळ दाखवला. हैदराबादवर त्यांनी एकतर्फी मात करत 13 व्या सामन्यातच प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. मागील वर्षी देखील त्यांनी असाच खेळ दाखवत दोन सामने शिल्लक असताना, प्ले ऑफमध्ये धडक मारलेली.
गुजरात टायटन्स मागील वर्षी आयपीएल मध्ये सहभागी झाली आहे. क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी फ्रॅंचाईजी म्हणून त्यांचा उल्लेख होतो. आपल्या पहिल्या हंगामात त्यांनी कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नसलेल्या हार्दिक पंड्या याच्याकडे नेतृत्व दिले होते. तर, मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याच्याकडे जबाबदारी दिली होती. गुजरातने मागील हंगामात सर्वांना चकित करत पहिल्याच वर्षी आयपीएल जिंकण्याची कामगिरी करून दाखवली. त्या हंगामात नऊ वेगवेगळ्या खेळाडूंनी सामनावीर पुरस्कार पटकावला होता.
यावेळी देखील गुजरातने आपली तीच कामगिरी पुढे नेली. कर्णधार हार्दिक पंड्या, उपकर्णधार राशिद खान, शुबमन गिल, मोहम्मद शमी व डेव्हिड मिलर यांनी आपली जबाबदारी ओळखून संघाला प्रत्येक वेळी मदत केली. दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करत असलेल्या मोहित शर्मा व पदार्पण करणाऱ्या नूर अहमद यांची कामगिरी लक्षणीय ठरली. त्यासोबतच युवा फलंदाज साई सुदर्शन आणि राहुल तेवतिया यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीत संघाच्या विजयाचे योगदान दिले.
गुजरातचे 18 गुण झाले असल्याने ते क्वालिफायर सामना खेळणार असल्याचे नक्की आहे. त्यामुळे त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन संधी मिळतील. अशात ते आता आपले विजेतेपद राखणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
(Gujarat Titans Consecutive Year Reach Play Offs In IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! चेन्नईचे 16.25 कोटी पाण्यात, IPL मध्येच सोडून ‘या’ दिवशी मायदेशी परतणार स्टोक्स; लगेच वाचा
गुजरातचं कंबरडं मोडत भुवीने रचला इतिहास! IPLमध्ये एकदा नाही, तर दुसऱ्यांदा केली जबरदस्त कामगिरी