इंडियन प्रीमिअर लीग 2023 मध्ये रविवारी (9 एप्रिल) डबल हेडर सामने खेळले गेले. दिवसातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, या सामन्यात गुजरातचा नियमित करण्यात हार्दिक पंड्या सहभागी झाला नाही. त्याच्याजागी फिरकीपटू राशिद खान याने गुजरातचे नेतृत्व केले.
गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या गुजरातने आपले पहिले दोन्ही सामने खिशात घातले आहेत. पहिल्या सामन्यात गुजरातने चेन्नईला मात दिली. तर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी दिल्लीला पराभूत करत आपली घौडदौड सुरू ठेवली. विजयाची हीच मालिका पुढे ठेवण्यासाठी गुजरात प्रयत्न करताना दिसला. मात्र, या सामन्यात नियमित कर्णधार हार्दिक पंड्या सहभागी होऊ शकला नाही. नाणेफेकी वेळी बोलताना काळजीवाहू कर्णधार राशिद खान म्हणाला,
“हार्दिकबाबत काळजी करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. त्याला थोडे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याने या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला. केवळ अतिरिक्त जोखीम नको म्हणून तो बाहेर आहे. पुढच्या सामन्यात तो खेळताना दिसेल.”
मागील वर्षी देखील हार्दिकच्या अनुपस्थितीत राशिदने गुजरातचे नेतृत्व केले होते. घरच्या मैदानावर संघाला सलग दुसरा विजय मिळवून देण्याचे आव्हान आता राशिद व संघावर असेल.
कोलकाताविरुद्ध गुजरातची प्लेईंग इलेव्हन-
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
(Gujarat Titans Hardik Pandya Feel Unwell Against KKR In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाने फक्त कॅच नाही घेतला, अंपायरचा जीव पण वाचवलाय; एक्सप्रेसच्या वेगाने आलेला चेंडू जड्डूने चित्त्याच्या चपळाईने पकडला
सलग दुसऱ्या पराभवानंतर संघातील वरिष्ठ खेळाडूंवर भडकला रोहित शर्मा, स्वतः बद्दलही केले मोठे वक्तव्य, वाचा





