गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला मात दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने चेन्नई सुपर किंग्जला 5 विकेट्सने पराभूत केले. गुजरात संघाची सुरुवात विजयाने झाली असली तरी, त्यांच्यासाठी दुसऱ्याच दिवशी एक खराब बातमी समोर आली. अनुभवी फलंदाज केन विलियम्सन पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. संघ व्यवस्थापनाने याबाबतची घोषणा रविवारी (2 एप्रिल) केली.
चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध क्षेत्ररक्षण करताना 13 व्या षटकातनंतर केनला मैदान सोडावे लागले होते. डीप स्केअर लेगला सीमारेषेजवर विलियम्सन क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. यावेळी षटकार रोखण्याच्या प्रयत्नात त्याच्या गुडघ्याला ही दुखापत झाली. परिणामी, त्याला मैदान सोडावे लागले. दुसऱ्या डावात गुजरातने विलियम्सनच्या जागी इम्पॅक्ट खेळाडूच्या रूपात साई सुदर्शन याला मैदानात बोलावले.
शनिवारी विलियम्सन याच्या गुडघ्याचे स्कॅनिंग केल्यानंतर तो आगामी दीड ते दोन महिने क्रिकेट खेळू शकणार नाही असे सांगितले गेले. त्यानंतर गुजरातने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली. संघाकडून सांगितले गेले की,
We regret to announce, Kane Williamson has been ruled out of the TATA IPL 2023, after sustaining an injury in the season opener against Chennai Super Kings.
We wish our Titan a speedy recovery and hope for his early return. pic.twitter.com/SVLu73SNpl
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 2, 2023
‘आम्हाला सांगताना वाईट वाटत आहे की, केन चेन्नईविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर गेला आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करू.’
केन यावर्षी प्रथमच गुजरात टायटन्ससाठी खेळत होता. 2016 ते 2022 या कालावधीत त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2021 मध्ये त्याच्या नेतृत्वात हैदराबाद संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. हैदराबाद संघाने त्याला रिटेन न केल्याने तो लिलावात सहभागी झाला होता. गुजरातने त्याच्यावर एकमेव बोली लावत त्याला 2 कोटी रुपयांना खरेदी केलेले.
(Gujarat Titans Kane Williamson Ruled Out From IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे! 2011 विश्वविजेत्या संघातील 16 पैकी केवळ दोन जण आजही खेळताय टीम इंडियाकडून क्रिकेट
तब्बल 28 वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे 11 नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून