आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी सर्व संघ आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट तयार करण्यात गुंतले आहेत. संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत बीसीसीआयला रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट सुपुर्त करायची आहे. आता समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, आयपीएल 2022 विजेत्या गुजरात टायटन्सनं स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला रिटेन केलेलं नाही. रिपोर्ट्सनुसार, संघानं 3 खेळाडूंना रिटेन केलं आहे.
बातमी येत आहे की, गुजरात टायटन्सनं कर्णधार शुबमन गिल, अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान आणि भारताचा युवा फलंदाज साई सुदर्शन यांना रिटेन केलं आहे. या लिस्टमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचं नाव नाही. याशिवाय संघ काही अनकॅप्ड खेळाडूंना देखील रिटेन करू शकतो. मात्र याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही.
येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापासून टीम इंडियाबाहेर आहे. शमीनं भारतासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. बीसीसीआयनं नुकताच बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. मात्र या संघातही शमीचं नाव नव्हतं. शमी दुखापतीमुळे आयपीएल 2024 मध्येही खेळला नव्हता. शमी क्रिकेटच्या मैदानावर कधी परतेल, याबाबत काहीही सांगता येत नाही. कदाचित या कारणामुळेच गुजरातनं त्याला रिटेन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोहम्मद शमीनं 2013 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तो आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्ससाठी खेळला आहे. शमीनं आयपीएलच्या 110 सामन्यांमध्ये 127 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 26.86 एवढी राहिली. 4/11 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
हेही वाचा –
चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केली रिटेन होणाऱ्या खेळाडूंची यादी! या 5 जणांना ठेवणार कायम?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?
IND vs AUS: रोहित-विराट नाही तर हा खेळाडू रिकी पाँटिंगचा आवडता