---Advertisement---

विजयाचा आनंद किती मोठा असतो? गुजरात संघाचा ‘हा’ Video बघा, एकदम भारी

Gujarat-Titans
---Advertisement---

कोलकाता। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील प्लेऑफची फेरी मंगळवारी (२४ मे) सुरू झाली. या फेरीतील क्वालिफायर एकचा सामना सर्वात आधी खेळवण्यात आला. ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर गुजरातच्या चाहत्यांचा आणि खेळाडूंना उत्साह देखील बघण्यासारखा होता. 

या सामन्यात गुजरातसमोर राजस्थानने (Gujarat Titans vs Rajasthan Royals) जोस बटलरच्या (Jos Buttler) ८९ धावांच्या खेळीच्या जोरावर १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने १० व्या षटकात ३ विकेट्स गमावल्या होत्या. तसेच धावाही अखेरच्या १० षटकात जवळपास १० च्या रनरेटनी त्यांना हव्या होत्या. नेमक्या याच क्षणी डेव्हिड मिलर (David Miller) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांची जोडी जमली आणि त्यांनी गुजरातची नौका विजयाच्या तीरापर्यंत नेली.

या दोघांनी नाबाद १०६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे गुजरातने १९.३ षटकात १९१ धावा करत विजय मिळवला. मिलरने अर्धशतकी खेळी करताना ३८ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याला हार्दिकची चांगली साथ मिळाली. हार्दिकने २७ चेंडूत ५ चौकारांसह ४० धावा केल्या. तत्पूर्वी, शुबमन गिलने आणि मॅथ्यू वेड यांनी प्रत्येकी ३५ धावांची खेळी केली होती.

गुजरातचा गगनाला भिडणारा उत्साह
या सामन्यात अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मिलरने विजयी षटकार खेचला होता. विशेष म्हणजे अखेरच्या षटकात १६ धावांची गरज असताना मिलरने षटकाच्या पहिल्या तिन्ही चेंडूवर षटकार ठोकले आणि गुजरातला विजय मिळवून दिला. या रोमांचकारी विजयानंतर गुजरातच्या खेळाडूंनी जोरदार आनंद (Winning Celebration) साजरा केला.

यावेळी मिलरने विजयी षटकार खेचल्यानंतर जोरदार जल्लोष केला. त्यानंतर हार्दिकने त्याला घट्ट मिठी मारली. तसेच त्याचवेळी डगआऊटमध्येही गुजरातच्या खेळाडूंनी आणि सपोर्ट स्टाफने जल्लोष केला. नंतर खेळाडूंनी मिलरला शबासकीही दिली. इतकंच नाही तर स्टेडियममध्ये सामना पाहायला आलेल्या गुजरातच्या चाहत्यांमध्येही उत्साह दिसून येत होता.

त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता, कारण त्यांनी या विजयासह त्यांचे अंतिम सामन्यातील स्थान पक्के केले. तसेच त्यांचा हा पहिलाच आयपीएल हंगाम देखील आहे. त्यातही त्यांना अहमदाबादला म्हणजेच त्यांच्या घरच्या मैदानात खेळण्यास मिळणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

राजस्थान रॉयल्समध्ये सॅमसनचीच सत्ता, मोडला अजिंक्य रहाणेचा मोठा विक्रम

मुंबईच्या निवड प्रक्रियेवर सचिनची मोठी प्रतिक्रिया, मुलगा अर्जुनच्या पदार्पणावर पहिल्यांदाच बोलला ‘असं’ काही

बटलर, सॅमसनच्या वादळी खेळींवर पाणी, गुजरातचा राजस्थानवर ७ विकेट्सने विजय, थेट अहमदाबादेत खेळणार फायनल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---