इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १६वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात खेळला गेला. हा सामना शुक्रवारी (दि. ०८ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. या हंगामातील गुजरात संघाचा हा सलग तिसरा विजय होता. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार शुबमन गिल ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, राहुल तेवतियाने शेवटच्या २ चेंडूंवर दोन षटकार ठोकत संघाला सामना जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत पंजाबला (Punjab Kings) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी फलंदाजी करताना पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या. पंजाबचे १९० धावांचे आव्हान गुजरात संघाने ६ विकेट्स राखत पूर्ण केले.
गुजरात संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुबमन गिलचे (Shubman Gill) ४ धावांनी शतक हुकले. त्याने ५९ चेंडूत सर्वाधिक ९६ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ११ चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त साई सुदर्शनने ३५, कर्णधार हार्दिक पंड्याने २७ आणि राहुल तेवतियाने १३ धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात १९ धावांची आवश्यकता असताना तेवतियाने शेवटच्या २ चेंडूंवर खणखणीत षटकार ठोकत संघाला सामना जिंकून दिला.
That last over: 😨😱🤯😰😂🤩#SeasonOfFirsts #AavaDe #PBKSvGT pic.twitter.com/j39VOfmR6G
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त राहुल चाहरला १ विकेट घेता आली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ६४ धावा केल्या. या धावा करताना त्याने ४ षटकार आणि ७ चौकार ठोकले. त्याच्याव्यितिरिक्त शिखर धवनने ३५, जितेश शर्माने २३ आणि राहुल चाहरने २२ धावा केल्या. या खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार मयंक अगरवाल तर फक्त ५ धावांवर तंबूत परतला.
यावेळी गुजरात संघाकडून गोलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त दर्शन नळकांडेने २, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.
गुजरात संघ या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आला आहे, तर पंजाब संघ सहाव्या स्थानी घसरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘पंत जबाबदारीने खेळला, तर या आयपीएलमध्ये अपयशी ठरेल’, भारतीय दिग्गजाचा सल्ला
अगदी सचिनपासून ते धोनीपर्यंत, भारताच्या भल्या भल्या फलंदाजांना जे जमलं नाय ते शिखरने करुन दाखवलं