---Advertisement---

GT vs RR: गुजरात विरुद्ध राजस्थान कोण मारणार बाजी? जाणून घ्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन

---Advertisement---

शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स आयपीएल 2025 स्पर्धेत जोरदार प्रदर्शन करत आहे. संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि यामध्ये 6 सामन्यात विजय मिळवून संघ पॉइंट्स टेबलवर दुसऱ्या स्थानावर आहे. संघाचा नेट रन रेट सुद्धा चांगला आहे. गुजरातचा 28 एप्रिल सोमवार रोजी सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. गुजरातने हा सामना जिंकला तर ते पॉइंट्स टेबलवर टॉप वर पोहोचतील.

संघाने त्यांचे मागचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि आजही ते जिंकण्याच्याच तयारीने मैदानात उतरतील. आजच्या सामन्यात कदाचित ते प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात आणि जर केला तर ते अष्टपैलू राहुल तेवतियाला बाहेर ठेवू शकतात. या मागचं कारण सुद्धा त्याचे या हंगामातील खराब प्रदर्शन आहे. त्याने या हंगामात चांगले प्रदर्शन केले नाही. त्याच्या जागी संघ वेगवान गोलंदाज ईशान शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतात. ज्यामुळे गोलंदाजी मजबूत होऊ शकते.

राजस्थान विरुद्ध सामन्यात गुजरातच्या तीन‌ फलंदाजांकडून प्रत्येक वेळेप्रमाणे चांगले खेळण्याची अपेक्षा असेल. ज्यामध्ये साई सुदर्शन, कर्णधार गिल आणि जॉस बटलर. याच प्रकारे राजस्थान रॉयल्सला सुद्धा हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. राजस्थानने आठ सामन्यांमध्ये केवळ दोन विजय मिळवले आहेत.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन:

गुजरात टायटन्स: शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन,जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा.

राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार),यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष तीक्षणा, शुभम दुबे, संदीप शर्मा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---