इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गुणतालिकेत शेवटपर्यंत पहिल्या स्थानावर कायम राहून विजेतेपद पटकावण्याची कामगिरी आतापर्यंत फक्त दोनच संघांनी केली आहे. असा पराक्रम २००८मध्ये राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्यांदा आणि मुंबई इंडियन्सने तीन वेळा केला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात नवखा गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. यामुळे या संघाला विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.
गुजरात संघाची आकडेवारी पाहता हा संघ हा आयपीएल हंगाम जिंकण्याची शक्यता अधिक आहे. हार्दीक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने १४ पैकी १० सामने जिंकत प्लेऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. आयपीएलच्या आधीच्या हंगामांमध्ये मुंबईने गुणतालिकेत शेवटपर्यंत पहिल्या स्थानावर कायम राहत २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये विजेतेपद पटकावले आहे.
आयपीएलच्या १५ हंगामांच्या गुणतालिकेत शेवटपर्यंत पहिल्या स्थानावर राहिलेले संघ:
२००८ – राजस्थान रॉयल्स (आयपीएल विजेतेपद जिंकला)
२००९ – दिल्ली
२०१० – मुंबई
२०११ – बेंगलोर
२०१२ – दिल्ली
२०१३ – चेन्नई
२०१४ – पंजाब
२०१५ – चेन्नई
२०१६ – गुजरात
२०१७ – मुंबई (आयपीएल विजेतेपद जिंकला)
२०१८ – हैद्राबाद
२०१९ – मुंबई (आयपीएल विजेतेपद जिंकला)
२०२० – मुंबई (आयपीएल विजेतेपद जिंकला)
२०२१ – दिल्ली
२०२२ – गुजरात (???)
गुजरात संघाप्रमाणेच लखनऊ सुपरजायंट्स देखील यावर्षी पहिलाच हंगाम खेळत आहे. या दोन्ही संघांनी त्यांंच्या पहिल्याच आयपीएल हंगामामध्ये उत्तम कामगिरी करत क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित केले आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ संघाने १४ पैकी ९ सामने जिंकत गुणतालिकेत तिसरे स्थाने काबीज केले आहे.
पंधराव्या आयपीएल हंगामाच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स संघही आयपीएलचे दुसरे विजेतेपद आणि चौथ्या स्थानावर असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरही पहिले विजेतेपद मिळवण्यास उत्सुक आहे.
सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रविवारी (२२ मे) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामातील शेवटचा साखळी सामना खेळला गेला. हा सामना पंजाबने ५ विकेट्सने जिंकला. तर २४ मेला खेळल्या जाणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्याने प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. हा सामना गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात इडन गार्डन, कोलकाता येथे होणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुरेश रैना म्हणतोय आरसीबीने जिंकावे आयपीएल; कारण ऐकून व्हाल चकीत
गुजरातला आयपीएल विजेतेपद जिंकायचे असेल, तर ‘या’ ५ खेळाडूंना दाखवावी लागेल कमाल
पुण्यातील अस्पायर एफसीची गोकुलमशी विकास भागीदारी