---Advertisement---

GT vs SRH: गुजरातने टॉस जिंकला, हैदराबादला दिले फलंदाजीचे आमंत्रण

---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 19 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद दोन्ही संघात खेळला जाणार आहे. हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हैदराबादला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. पॉइंट्स टेबलमध्ये हैदराबाद दहाव्या स्थानी तर गुजरात संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच हैदराबाद स्टेडियमवर आज स्पर्धेतील तिसरा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने स्पर्धेतील चार सामन्यांमध्ये फक्त एक सामना जिंकला आहे, तसेच तीन सामन्यांमध्ये त्यांनी पराभव पत्करलेला आहे. तसेच गुजरातने या हंगामात तीन सामन्यांमध्ये दोन सामन्यात विजय मिळवलेला आहे. मागच्या सामन्यात गुजरातने आरसीबीचा जोरदार पराभव करत सामना जिंकला होता. याचबरोबर हैदराबादने मागच्या सामन्यात कोलकाता कडून 80 धावांनी पराभव पत्करला होता.

तसेच आज दोन्ही संघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळू शकते.

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन: –

गुजरात टायटन्स: शुबमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, ईशांत शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्स, ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेन्रीक क्लासेन, अनिकेत वर्मा, कमींदु मेंडीस,जीशान अन्सारी, जयदेव उनडकट, मोहम्मद शमी.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---