इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १५व्या हंगामाला नवा विजेता मिळाला आहे. यंदाच्या अंतिम सामन्याची अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम येथे २९ मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघात पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ लाखांहून अधिक प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आणि आपल्या घरच्या म्हणजेच गुजरातच्या संघाला समर्थन करायला उपस्थित होते. त्यावेळी गुजरात क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विशेष उपस्थित होते. यावेळी भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला विशेष भेटवस्तू देत सन्मानित केले.
गुजरातने पदार्पणाच्या मोसमातच आयपीएल चॅम्पियन बनून या संघाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुजरातच्या या विजयानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी संपूर्ण संघाची भेट घेतली आणि यादरम्यान त्यांनी टीमचा कर्णधार हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) स्मृतिचिन्ह दिले. सोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आयपीएल २०२२ विजेत्या गुजरात टायटन्स संघाची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर गुजरात टायटन्सने अहमदाबादमध्ये रोड शो आयोजित करून आपल्या चाहत्यांचे आणि समर्थकांचे आभार व्यक्त करणार आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करून आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला. यासह हार्दिक पांड्या आयपीएल इतिहासातील तिसरा कर्णधार बनला आहे, ज्याने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्याआधी शेन वॉर्न आणि रोहित शर्मा यांनी ही अप्रतिम कामगिरी केली आहे. गुजरातने जेतेपद पटकावल्यानंतर तब्बल पाच वर्षांनंतर आयपीएलला नवा चॅम्पियन मिळाला आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १३० धावा केल्या, हे लक्ष्य गुजरातने ११ चेंडू शिल्लक असताना तीन विकेट गमावून पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार हार्दिक ३४ आणि शुबमन गिलने नाबाद ४५ धावा केल्या. या पराभवामुळे राजस्थानचे तब्बल १४ वर्षांनंतर विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
बीसीसीआयची दरियादिली! पिच क्यूरेटर आणि ग्राउंड्समनलाही केले मालामाल, दिले चक्क कोटीत पैसे
घोरपडी तमिळ युनायटेड, केएमपीचे चुरशीचे विजय
अबब! २० षटकांच्या आयपीएलमध्ये मुंबईने १४६ धावांच्या अंतराने जिंकलाय सामना, पाहा असे टॉप-३ सामने