---Advertisement---

‘गुजरात जायंट्स’ने ‘बेंगाल वॉरियर्स’ला दाखवले आस्मान, ९ गुणांनी सामना घातला खिशात

On: मंगळवार, फेब्रुवारी 1, 2022 8:37 PM
Bengal vs Gujrat Kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी (१ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ८६ वा सामना गुजरात जायंट्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स यांच्यात रंगला. गुजरात जायंट्सने ३४-२५ च्या फरकाने हा सामना जिंकला आहे.

या सामन्यात पहिल्या हाफपर्यंत दोन्हीही संघ बरोबरीचे प्रदर्शन करत होते. पहिल्या हाफमध्ये गुजरात जायंट्सने फक्त एका गुणाने आघाडी घेतली होती. परंतु पुढे गुजरात जायंट्सच्या कबड्डीपटूंनी बेंगाल वॉरियर्सला बॅकफूटवर सोडले. गुजरात जायंट्सचा संघ सामना संपायला अवघे काही मिनिट बाकी असताना बेंगाल वॉरियर्सपासून १० गुणांची पुढे होता. परिणामी बेंगाल वॉरियर्सला गुणांचे हे अंतर पार करता आले नाही आणि त्यांनी ९ गुणांच्या फरकाने हा सामना गमावला.

महत्त्वाच्या बातम्या-

पहिल्याच हंगामात आरसीबीने पैशांचा पाऊस पाडल्याने विराट झालेला चकित, २००८च्या आठवणीत झाला भावुक

विराटने गिफ्ट केला होता फ्लॅट, तर धोनीने बोलावले होते मुंबईला, कोण आहे ही पूजा बिश्नोई? घ्या जाणून

मोदींचे क्रीडा प्रेम पुन्हा बहरले, गतसालापेक्षा बजेटमध्ये यंदा ३०० कोटींची वाढ; काँग्रेस किती द्यायचं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---