प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या ९ तारखेला प्रो कबड्डीचा १०५ वा सामना तेलुगू टायटन्स आणि गुजरात जायंट्स संघात झाला. गुजरात जायंट्सने केवळ २ गुणांच्या अंतराने तेलुगू टायटन्सला या सामन्यात पराभवाचा धक्का दिला.
Telugu Titans face another defeat in PKL 8.😍💥👇#PKL #PKL8 #ProKabaddiLeague #VIVOProKabaddi #Kabaddi pic.twitter.com/N5tDgfeXOw
— Khel Kabaddi (@KhelNowKabaddi) February 9, 2022
तत्पूर्वी प्रो कबड्डीचा १०४ वा सामना तमिळ थलाईव्हाज आणि यूपी योद्धा यांच्यात झाला. या सामन्याच्या पहिल्या हाफपर्यंत तमिळ थलाईव्हाज २२-२० ने आघाडीवर होते. पण पुढे यूपी योद्धांनी सामन्यात पुनरागमन करत ४१-३९ने हा सामना जिंकला आहे.
प्रो कबड्डी लीग २०२१ च्या गुणतालिकेवर नजर टाकायची झाल्यास, पटणा पायरेट्सचा संघ चौथ्या जेतेपदावर मोहोर मारण्याच्या नजीक आहे. त्यांनी आतापर्यंत १७ सामने खेळले असून त्यापैकी सर्वाधिक १२ सामने जिंकत ६५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर त्यांच्यापाठोपाठ हरियाणा स्टिलर्स संघ ५८ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच दबंग दिल्ली (५७ गुण), बेंगलुरू बुल्स (५५ गुण) आणि पिंक पँथर्स (५१ गुण) टॉप-५ मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चुरशीच्या लढतीत यूपी योद्धांची बाजी, तमिळ थलाईव्हाजला २ गुणांनी चारली धूळ
रिषभने दुसऱ्या वनडेत उगाच दिली नाही सलामी, कर्णधार आणि प्रशिक्षकाने खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय