---Advertisement---

यूपीच्या अष्टपैलूवर गुजरात टायटन्सने लावला डाव, तब्बल ३.२० कोटींची किंमत केली खर्च

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 4:07 PM
Gujrat-Gaints
---Advertisement---

मार्च महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनकॅप्ड खेळाडू यश दयाल याला कोटींमध्ये पैसे मोजत फ्रँचायझींनी विकत घेतले आहे.

२४ वर्षीय यशला नव्या गुजरात टायटन्स संघाने ३ कोटी २० लाखांना विकत घेतले आहे. त्याची लिलावातील मूळ किंमत फक्त २० लाख रुपये होती. त्यामुळे चक्क कोटींमध्ये त्याला बोली लागणे ही त्याच्यासाठी मोठी गोष्ट असेल.

यश फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतही पारंगत आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्त्व करतो. त्याने आतापर्यंत १२ प्रथम श्रेणी सामने, १४ अ दर्जाचे सामने आणि १५ टी२० सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अनकॅप्ड महिपाल लोमरोरची चांदी, ‘इतक्या’ लाखांसह आरसीबीत सामील; आयपीएलचा आहे चांगला अनुभव

‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धन हंगारगेकर बनला चेन्नईचा ‘सुपरकिंग’

बावाची IPL लिलावात हवा! वर्ल्डकपमधील कामगिरीने वाढला भाव, पंजाबने मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---