हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्स संघ शानदार प्रदर्शन करत आहे. त्यांनी शनिवारी (३० एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ६ विकेट्सने पराभूत करत हंगामातील आठवा विजय नोंदवला आहे. यासह गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. परंतु गुजरात संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरला आहे. अशात सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, त्यांच्यासाठी १६ गुण प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्यासाठी पुरेसे असतील का?
आयपीएल, या टी२० लीगचा इतिहास पाहायचा झाल्यास, गुजरात संघाला (Gujrat Titans) प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी (Gujrat Titans Play Off Equations) अजून काही सामने जिंकावे लागतील. आयपीएल २०२२मध्ये सहभागी सर्व संघांना १४-१४ सामने खेळायचे आहेत. त्यातील गुणतालिकेत पहिल्या ४ क्रमांकावर राहणाऱ्या संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
२०१२ मध्ये ८ विजय मिळवूनही संघ झाले होते बाहेर
आयपीएल २०१२ बद्दल बोलायचे झाल्यास, त्यावेळी एकूण ९ संघ हंगामात खेळले होते. दिल्ली कॅपिटल्सने सर्वाधिक ११ साखळी फेरी सामने जिंकले होते. तर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने १०-१० सामने खिशात घातले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांनी प्रत्येकी ८ विजय मिळवले होते. मात्र नेट रन रेटच्या जोरावर चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. तर पंजाब आणि बेंगलोर संघ बाहेर झाले होते. त्या हंगामात सर्व संघांना १६ साखळी फेरी खेळायला मिळाले होते.
२०१३ मध्ये ९ सामने जिंकूनही संघ झाले होते बाहेर
२०१३ हंगामातही ९ संघ आयपीएल खेळत होते आणि या सर्व संघांनी १६ साखळी फेरी सामने खेळले होते. त्यातील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ११ सामने जिंकले होते. त्यांच्यानंतर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ प्रत्येकी १० सामना विजयांसह प्लेऑफमध्ये पोहोचले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला ९ विजयांनंतरही प्लेऑफमध्ये पोहोचता आले नव्हते.
गुजरातला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल?
अशात आता चालू हंगामातील समीकरणे कशी असतील, हे पाहावे लागेल. या हंगामात सर्व संघांना १४ साखळी फेरी सामने खेळायचे आहेत. सध्या तरी गुजरातचा संघ सर्वात मजबूत स्थितीत आहे. जर त्यांनी अजून एकही सामना जिंकला, तर ते थेट प्लेऑफमध्ये जागा मिळवतील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शमीच्या खिलाडूवृत्तीला सलाम! प्रतिस्पर्धी असूनही अर्धशतक ठोकल्यानंतर विराटला दिल्या शुभेच्छा
फक्त महाराष्ट्रीयन खेळाडूंना घेऊन केलेली टीम इंडियाची वनडे ड्रीम ११, कर्णधाराचं नाव खूप खास
जॉय स्टोन मेटल इंडस्ट्रीज आयटीएफ एस२०० वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन






