इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सुरु होण्यास आता केवळ एक अठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे सर्व संघांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. असे असतानाच कोलकाता नाईट रायडर्स संघाला एक धक्का बसला. त्यांचा मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंग या संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्यामुळे केकेआर संघाला त्याच्या ऐवजी बदली खेळाडू या हंगामासाठी घ्यावा लागला आहे.
गुरकिरत घेणार रिंकू सिंगची जागा
रिंकू सिंगला आयपीएल २०२१ हंगामाला गुडघ्याच्या दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी केकेआरने यंदाच्या आयपीएल हंगामासाठी गुरकिरत सिंग मन याला बदली खेळाडू म्हणून संघात स्थान दिले आहे. गुरकिरतला त्याच्या लिलावादरम्यानच्या ५० लाखांच्या मुळ किंमतीत केकेआरने संघात सामील करुन घेतले आहे. त्यामुळे गुरकिरत आयपीएल कारकिर्दीतील आठवा हंगाम खेळण्यास सज्ज झाला आहे.
लिलावात राहिला होता अनसोल्ड
गुरकिरत मागीलवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. मात्र आरसीबीने त्याला आयपीएल २०२१ लिलावाआधी संघातून मुक्त केले होते. त्यामुळे तो ५० लाखांच्या मुळ किंमतीसह लिलावात उतरला होता. पण त्याला लिलावादरम्यान कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही. मात्र, आता त्याला रिंकू सिंगच्या ऐवजी बदली खेळाडू म्हणून केकआर संघात स्थान मिळाले आहे.
गुरकिरतची आयपीएलमधील कामगिरी
गुरकिरतने आत्तापर्यंत ७ आयपीएल हंगाम खेळले आहेत. त्याने या ७ हंगामात मिळून ४१ सामने खेळले असून २१.२९ च्या सरासरीने ५११ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने ५ विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ पूर्वी राहुल तेवतियाचा दिसला आक्रमक अंदाज; मारले लांबच लांब शॉट, पाहा व्हिडिओ
आयपीएल २०२१: ‘हे’ तीन संघ वाटत आहेत सर्वात कमकुवत; सर्वच्या सर्व आहेत माजी विजेते
आयपीएल २०२१: ‘हे’ तिघे पाडू शकतात आरसीबीसाठी धावांचा पाऊस