न्यूझीलंड विरूद्ध इंग्लंड (New Zealand vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 8 गडी राखून जिंकला. आता दोन्ही संघात (6 डिसेंबर) पासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्हमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा गोलंदाज गस ॲटकिन्सनने (Gus Atkinson) आपल्या गोलंदाजीने न्यूझीलंडचा कहर केला. ॲटकिन्सनने हॅट्ट्रिक घेत 3 वर्षांनी कसोटी क्रिकेटमधील हॅट्ट्रिकचा दुष्काळ मोडला. यासह, हॅट्ट्रिक घेणारा तो इंग्लंडचा 15वा गोलंदाज ठरला.
शनिवारी (7 डिसेंबर 2024) रोजी, गस ॲटकिन्सनने (Gus Atkinson) न्यूझीलंडविरूद्ध पहिली कसोटी हॅट्ट्रिक घेतली. ॲटकिन्सनने 8.5 षटकात 31 धावा देत एकूण 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या हॅट्ट्रिकमध्ये न्यूझीलंडचा नॅथन स्मिथ (Nathan Smith), मॅट हेन्री (Matt Henry), टिम साऊदीचा (Tim Southee) समावेश होता. याआधी त्याने न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेलाही (Devon Conway) 11 धावांवर तंबूत पाठवले होते.
गस ॲटकिन्सनने (Gus Atkinson) नॅथन स्मिथला बाद करून हॅट्ट्रिकची सुरुवात केली. यानंतर मॅट हेन्री धारदार बाऊन्सरचा बळी ठरला आणि लेनमध्ये उभ्या असलेल्या बेन डकेटला सोपा झेल दिला. तिसरी विकेट टीम साऊथीची होती. टिम साऊदी एका शानदार आत येणाऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.
Good morning, everyone #NZvENG
Gus Atkinson hat-trick pic.twitter.com/Xxnvx38Esv
— Marc Van de Velde (@MarcFVandeVelde) December 6, 2024
गस ॲटकिन्सनची ही हॅट्ट्रिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील 50वी हॅट्ट्रिक आहे. यामध्ये पुरूषांच्या कसोटी क्रिकेटमधील 47 हॅटट्रिक आणि महिलांच्या कसोटी क्रिकेटमधील 3 हॅटट्रिकचा समावेश आहे. ॲटकिन्सनची ही कामगिरी इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. ज्याने न्यूझीलंडची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
महत्त्वाच्या बातम्या-
विदेशी मैदानावर हॅरी ब्रुकची दमदार कामगिरी, पोहोचला महान दिग्गजाच्या रेकाॅर्डजवळ
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
दुसऱ्या डावात ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करावे लागणार, मिचेल स्टार्कने स्पष्टच सांगितलं






