---Advertisement---

कौतुकास्पद! 44 वर्षीय इम्रान ताहिरने आपल्या संघाला बनवले CPL Champions, पोलार्डसेनेचा 9 विकेट्सने पराभव

On: सोमवार, सप्टेंबर 25, 2023 9:30 AM
Imran-Tahir
---Advertisement---

जगभरातील प्रतिष्ठित टी20 लीगपैकी एक असलेल्या कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला विजेता मिळाला आहे. रविवारी (दि. 24 सप्टेंबर) गयाना येथे त्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरियर्स संघात स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सचा 9 विकेट्सने विजय झाला. खरं तर, आजपर्यंत गयाना विक्रमी 5 वेळा सीपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, पण त्यांना यावर्षी जेतेपद पटकावता आलं. गयानाचा कर्णधार इम्रान ताहिर याने वयाच्या 44व्या वर्षी आपल्या संघाला सीपीएलचा किताब जिंकून दिला.

नाणेफेकीचा निकाल गयानाच्या पारड्यात
या सामन्याचा निकाल गयाना ऍमेझॉन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) संघाच्या पारड्यात पडला होता. यावेळी गयानाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कायरन पोलार्ड याच्या नेतृत्वातील त्रिनबागो नाईट रायडर्स (Trinbago Knight Riders) संघाने प्रथम फलंदाजी करताना 18.1 षटकात फक्त 94 धावांवर नांग्या टाकल्या. हे आव्हान गयाना संघाने 14 षटकात 1 विकेट गमावत 99 धावा करून पार केले. अशाप्रकारे गयानाने हा सामना 9 विकेट्सने खिशात घातला.

गयानाकडून सईम अयूब याची कमाल
रायडर्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना गयानाकडून सईम अयूब (Saim Ayub) याने कमाल केली. त्याने सलामीला फलंदाजी करताना 41 चेंडूत सर्वाधिक नाबाद 52 धावांचा पाऊस पाडला. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि तब्ब्ल 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त शाय होप यानेही नाबाद 32 धावांचे योगदान दिले. तसेच, कीमो पॉल यानेही 11 धावा केल्या. रायडर्सकडून गोलंदाजी करताना यावेळी अकील होसेन यालाच एक विकेट घेता आली.

रायडर्सची कमकुवत फलंदाजी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रायडर्स संघाकडून फक्त कीसी कार्टी यालाच 45 चेंडूत सर्वाधिक 38 धावांचे योगदान देता आले. या खेळीत 1 षटकार आणि 2 चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त मार्क डेयल (16) आणि चॅडविक वॉल्टन (10) या दोघांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली.

यावेळी गयानाकडून गोलंदाजी करताना ड्वेन प्रिटोरियस चमकला. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 26 धावा खर्चून सर्वाधिक 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार इम्रान ताहिर (Imran Tahir) आणि गुडाकेश मोती यांनी प्रत्येकी 2 विकेट नावावर केल्या. तसेच, रोमारियो शेफर्ड आणि रोन्सफोर्ड बीटन यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले. (Guyana Amazon Warriors won by 9 wkts against Trinbago Knight Riders In CPL 2023)

महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजांनी चोपलं गोलंदाजांनी रोखलं! इंदोर वनडेत ऑस्ट्रेलियाचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियाचा मालिकाविजय
माझ्या चाहत्यांना सर्वस्व द्यायचे आहे, इंडियन ऑइल ग्रां प्री जिंकल्यानंतर बेझ्झेचीची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---